चंद्रपूर : चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष म्हणून निवड झाल्यानंतर रवींद्र शिंदे यांचा चंद्रपूर जिल्हा संस्था सचिव युनियनतर्फे शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
. कार्यक्रमाला संस्था सचिव युनियनचे अध्यक्ष हेमंत लोडे, उपाध्यक्ष मंगेश मस्के, सचिव प्रभाकर हनवते, तसेच सदस्य नरेश चौधरी, विठ्ठल हनवते, अश्विन हुलके, विनोद कापटे, सुधीर पिदूरकर, अरुण मोहीतकर, प्रविन गोखरे, शरद तेलंग, प्रशांत ठावरी, प्रमोद मत्ते, श्रीकृष्ण देवाळकर, प्रविन अतकारे, अक्षय क्षीरसागर आदी मान्यवर उपस्थित होते.
. सत्कार प्रसंगी रवींद्र शिंदे यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे प्रेम, आदर व शुभेच्छांबद्दल मनःपूर्वक आभार व्यक्त केले.


