कंत्राटीकरण व खाजगिकरण विरोधी जनाआक्रोश समितीचे आयोजन
शेकडो महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा समावेश
नागभीड
. नागभीड येथे कंत्राटीकरण व खाजगीकरण विरोधी जनआक्रोश समिती नागभीड च्या वतीने नागभीड येथे एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.. नागभीड तालुक्यातील विविध समाजिक संघटना, शिक्षक संघटना, स्पर्धा परीक्षा अभ्यासिका, महाविद्यालयीन विद्यार्थी एकत्र येत या धरणे आंदोलनाचे आयोजन केले.
. सदर आंदोलनामध्ये बहुसंख्य विद्यार्थी सहभागी झाले.. व त्यांनी सरकार करू पाहत असलेल्या कंत्राटीकरण व खाजगीकरण या सह दत्तक शाळ योजना या शासन निर्णया विरोधात आपला असंतोष आपल्या मनोगतातुन व्यक्त केला.. सदर धरणे आंदोलनाला जि. प. माजी सदस्य सतीश वारजूरकर यांनी भेट देत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी संवाद साधला व मार्गदर्शन केले.. या धरणे आंदोलनाच्या निवेदनातून राज्य शासनाने 6 सप्टेंबर रोजी कंत्राटी भरती संबधी काढलेला शासन निर्णय रद्द करावा, 20 पटसंख्या आतील शाळा बंद चे धोरण रद्द करावे, स्पर्धा परीक्षेकरिता आकारले जाणारे शुल्क कमी करणे, शासकीय सेवेतील रिक्त पदे लवकर भरण्यात यावी, जुनी पेन्शन योजना मंजूर करावी या सह विविध मागण्या करण्यात आल्या.
. सदर आंदोलनामध्ये औद्योगिक प्रशिक्षण संस्था नागभीड, गोविंदराव वारजूरकर महा.नागभीड, राष्ट्रपिता महात्मा गांधी विदयालय नागभीड, स्टडी सर्कल स्पर्धा परीक्षा अभ्यास केंद्र नागभीड येथील विद्यार्थी सहभागी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.. यावेळी पुरोगामी शिक्षक संघटनेचे गजभे , दडमल , अखिल प्राथमिक शिक्षक संघटनेचे चंदनबावणे , विदर्भ माध्य. संघाचे प्रवीण नाकाडे , बांधिलकी फाउंडेशन चे अनमोल शेंडे, सरपंच संघटनेचे देवेंद्र गेडाम, सरपंच वाढोणा, शर्मिला रामटेके मॅडम सरपंच नवेगाव पांडव, कृती समिती संयोजक शगीर शेख, सतीश मेश्राम, श्रीकांत मंदे, पराग भानारकर,शिवसेना (उबाठा) संघटक विकी मडकाम, विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून लोकेश कावळे, विदर्भ माध्यमिक संघाचे प्रवीण नाकाडे , ओबीसी संघटनेचे चौधरी यासह इतर मान्य वरांनी मार्गदर्शन केले.. यावेळी अरविंद राऊत जिल्हा अध्यक्ष मुख्याध्यापक , बोकडे मुख्यध्यापक संघ, विदर्भ माध्य.संघाचे ठाकरे , मेश्राम , जाधव , ठाकरे , दांडेकर, मॅडम, या सह झेप निसर्ग मित्र संस्थेचे अध्यक्ष पवन नागरे, राऊत, नागभीड जिल्हा निर्मिती कृती समितीचे रमेश ठाकरे, मनोज लडके, अखिल भारतीय ओबीसी संघटनेचे पदाधिकारी, ग्रामपंचायत संगणक चालक संघटनेचे पदाधिकारी यांची उपस्थिती होती.
. सदर मागण्याचे निवेदन तहसीलदार मनोहर चव्हाण यांना विद्यार्थी वर्गाच्या वतीने देण्यात आले..!!

