Home सामाजिक शालेय विद्यार्थ्यांच्या अंगी सांस्कृतिक मूल्ये रुजविण्याकरिता करिता दांडियाचे आयोजन

शालेय विद्यार्थ्यांच्या अंगी सांस्कृतिक मूल्ये रुजविण्याकरिता करिता दांडियाचे आयोजन

586

भारतीय संस्कृती व नृत्याविष्कारास चालना देणारा फेयरी लँड स्कूल चा उपक्रम

भद्रावती : शहरातील गवराळा वॉर्ड भद्रावती येथील फेयरी लँड स्कूल चे संस्थापक युवराज धानोरकर यांच्या मार्गदर्शनात दिनांक २४ सप्टेंबर रोज बुधवारला विद्यार्थी व शिक्षकां करिता रास गरबा अर्थात दांडिया उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. याद्वारे विद्यार्थ्यांच्या अंगी असणाऱ्या सुप्त नृत्य अविष्कारास चालना देण्याचा स्तुत्य उपक्रम पार पडला.

.      कार्यक्रमाच्या प्रारंभी प्राचार्या वर्षा धानोरकर यांच्या अध्यक्षतेखाली व उप प्राचार्या अर्चना धोटे, प्रयवेक्षिका कुमुद पोहिनकर यांचे हस्ते माता सरस्वतीचे विधिवत पूजन करण्यात आले. शाळेचे संगीत शिक्षक दानिश शेख यांच्या संकल्पनेतून सुमधुर गणेश वंदना या नृत्य आविष्कारातून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यानंतर शाळेतील मुला मुलींनी आकर्षक व दिमाखदार पोशाख परिधान करून स्पर्धात्मक दांडियाचा मनसोक्त आनंद लुटला.

.     स्पर्धेच्या शेवटी शाळेच्या वत्तीने स्पर्धकास भद्रावती च्या इनरव्हिल क्लब सदस्यांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले.कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता शाळेच्या सर्व शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले. उपस्थित पालक व परीक्षक यांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

error: Content is protected !!