आदिवासी विकासासाठी प्रशासन कटिबद्ध – तहसीलदार भांडारकर
भद्रावती : केंद्र शासनाच्या आदिवासी कार्य मंत्रालयाने सुरू केलेल्या नेतृत्व विकास कार्यक्रम ज्याचा उद्देश आदिवासी समूहाचे सक्षमीकरण करणे आणि त्यांना मुख्य प्रवाहात आणणे तद्वतच या अभियानाद्वारे नेतृत्व संपन्न असे आदि कर्मयोगी बनवून त्यांच्यात नेतृत्वाची संधी निर्माण करने जेणेकरून ते त्या भागातील आदिवासींच्या समस्या सोडवू शकतील.
. प्रशासनाला साहाय्य करू शकतील या सर्व मूळ हेतू व उद्दिष्ट्ये साध्य करण्यासाठी तहसीलदार यांचे प्रमुख उपस्थितीत व गावकरी, सरपंच, सदस्य, महिला बचत गट, स्वयंसेवी संस्था, भजन मंडळ आदींच्या पुढाकारातून भद्रावती तालुक्यातील शेगाव (खुर्द) येथे कर्मयोगी अभियानास प्रारंभ करण्यात आला.
. या अभियानाअंतर्गत आदिवासीचे सक्षमीकरण, शासन व लोकसहभागातून विकास, लोकांपर्यंत शासकीय योजनांचा लाभ पोहचविणे तसेच आदिवासींच्या सामाजिक, कौटुंबिक, आर्थिक, शैक्षनिक विकासाला चालना देणे इत्यादी दृष्टीने हे अभियान राबविण्यात येत आहे.
. शेगाव खुर्द येथील या अभियानातून अतिक्रमित रस्त्यांचा निपटारा, स्मशानभूमी समस्या, आदी सह लोकसहभागातून गाव शिवार फेरी आयोजित करण्यात आली आणि महिला पुरुष, कारागीर, शेतकरी, मजूर यांच्याशी सविस्तर चर्चा करून समस्येचे निराकरण करण्यात आले.

