चंद्रपुर : श्री साई कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, भद्रावती येथील इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी विभागातील 26 विद्यार्थ्यांनी दिनांक 19 सप्टेंबर 2025 रोजी चंद्रपूर सुपर थर्मल पॉवर स्टेशन (CSTPS) ला औद्योगिक भेट दिली.
![]()
. ही भेट महाविद्यालयाच्या प्रशिक्षण व रोजगार मार्गदर्शन अधिकारी मोहिनी रॉय, प्रा. निगार शेख, प्रा. कंचन धनालकोटवार यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली होती. या भेटीद्वारे विद्यार्थ्यांना वीज निर्मिती केंद्रातील प्रचंड क्षमतेच्या यंत्रणांची माहिती तसेच थर्मल पॉवर प्रकल्पातील प्रत्यक्ष कामकाजाचे महत्त्वपूर्ण ज्ञान मिळाले.
. या उपक्रमासाठी महाविद्यालयाचे व्यवस्थापन सदस्य विद्या येरगुडे, अभिषेक येरगुडे, अमित येरगुडे, रोहनिका येरगुडे, प्राचार्य डॉ. पद्मनाभ गाडगे तसेच विभागप्रमुख प्रा. दिनेश मजुमदार यांचे विशेष सहकार्य लाभले. या औद्योगिक भेटीमुळे विद्यार्थ्यांना सिद्धांतिक ज्ञानासोबतच औद्योगिक वास्तवाचा अनुभव घेता आला व त्यांच्या शैक्षणिक प्रवासात मोलाची भर पडली.


