Home सामाजिक विसापूरकरांनी केला माजी मंत्री सुधीर मुनगंटीवारांचा नागरी सत्कार

विसापूरकरांनी केला माजी मंत्री सुधीर मुनगंटीवारांचा नागरी सत्कार

594

आपल्या आदरातिथ्याचा कधीही विसर पडणार नाही

आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली भावना

बल्लारपूर : आपल्या सार्वजनिक जीवनात मनापासून कार्य केले. यश,अपशाची कधी पर्वा केली नाही. नेहमी लोकहितांचा विचार केला. प्रत्येक वेळी येथील नागरिकांनी मला साथ दिली. मनापासून प्रेम दिले.आपल्या प्रेमामुळे राज्य पातळीवर सार्वजनिक जीवनात काम करण्याची संधी मिळाली.आपल्या आपुलकीचा, प्रेमाचा व आदरातिथ्याचा कधीही विसर पडू देणार नाही, असे भावोद्गागार माजी अर्थ, नियोजन व वनमंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी विसापूर येथे व्यक्त केले.

.       बल्लारपूर तालुक्यातील विसापूर येथे छत्रपती शिवाजी महाराज चौक सार्वजनिक मंचावर विसापूरकरांनी माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा नागरी सत्कार केला. यावेळी सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते.

.        आमदार मुनगंटीवार म्हणाले, मी मागील तीन दशकापासून सार्वजनिक जीवनात कार्यरत आहे. आपल्या भागाचा सर्वांगीण विकास केला. महिलांच्या कार्य सक्तीला बळ देण्यासाठी एस. एन. डी. टी. महिला विद्यापीठाचे उपकेंद्र साकारत आहे. विविध प्रकारचे विकास कामे केली. आपले आदरातिथ्य याची साक्ष आहे. आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास या धर्तीवरच आपण कार्य करत आहोत. कोणत्याही समाजातील घटकांना नाराज केले नाही. ही माझ्या कार्याची पावती आहे, असे त्यांनी सांगितले.

.       यावेळी भाजपाचे माजी तालुका अध्यक्ष किशोर पंदीलवार, तालुका अध्यक्ष चंद्रकांत उर्फ पिंटू देऊळकर, सचिव गणेश टोंगे, रमेश लिंगमपल्लीवार, विलास भोयर, माजी जिल्हा परिषद सदस्य अंजली पंदीलवार, ग्रामपंचायत सदस्य सुरेखा ईटनकर, गजानन पाटणकर, शशीकला जीवने, सविता डाहुले, विनोद बुटले, मल्लेश कोडारी, अर्चना पोतराजे आदींनी आमदार सुधीर मुनगंटीवार यांचा शाल, स्मृतिचिन्ह व पुष्पहार अर्पण करून नागरी सत्कार केला. तत्पूर्वी माता का जागरण कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन ग्रामपंचायत सदस्य सुरज टोमटे यांनी केले. यावेळी नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

error: Content is protected !!