Home सामाजिक नंदोरी येथे ऊस लागवड शेतकरी संपर्क कार्यालयाचे उद्घाटन

नंदोरी येथे ऊस लागवड शेतकरी संपर्क कार्यालयाचे उद्घाटन

583

आधुनिक शेतीसाठी तांत्रिक दिशा : सारंग गडकरी

माजरी : शेतकरी उत्पादक कंपनी आणि मानस ऍग्रो इंडस्ट्रीज अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने स्थापन करण्यात आलेल्या ऊस लागवड शेतकरी संपर्क कार्यालयाचे उद्घाटन सारंग नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. भद्रावती तालुक्यातील नंदोरी येथे ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे.

.      या कार्यालयाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वैज्ञानिक नियोजन, आधुनिक तंत्रज्ञान, उत्पादनवाढीसाठी तांत्रिक मार्गदर्शन आणि शाश्वत शेतीसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध होणार आहेत. उच्च दर्जाचा ऊस, अधिक उत्पादनक्षमता आणि आर्थिक मजबुती या उद्दिष्टांसाठी हे केंद्र शेतकऱ्यांना मोलाची दिशा देणार आहे.

.     कार्यक्रमाच्या प्रस्तावनेत नंदोरी शेतकरी उत्पादक कंपनीचे अध्यक्ष नरेंद्र जिवतोडे यांनी सांगितले की, “सोयाबीन व कापूस या पारंपरिक पिकामुळे शेतकरी शारीरिक, आर्थिक व मानसिकदृष्ट्या त्रस्त झाला आहे. मात्र ऊस हे नगदी पीक शेतकऱ्यांना भरभराटीला नेणारे ठरेल. गडकरी साहेबांचा विकासाचा हा प्रयोग पश्चिम महाराष्ट्राप्रमाणे आपल्या भागातील शेतकऱ्यांना नवी दिशा देईल.” उदघाटन प्रसंगी बोलतांना सारंग गडकरी म्हणाले, “शेतकरी हा फक्त जगाचा पोशिंदा न राहता उद्योजक शेतकरी म्हणून उभा राहणे आवश्यक आहे. ऊस हे ऊर्जावान, पर्यावरणपूरक आणि कमी श्रम लागणारे पीक असून ते शेतकऱ्यांना खरी आर्थिक समृद्धी देऊ शकते.”

.       या प्रसंगी मानस इंडस्ट्रीज उपाध्यक्ष जयकुमार वर्मा, नंदोरी शेतकरी उत्पादक कंपनी अध्यक्ष नरेंद्र जीवतोडे, प्रबंध संचालक समय बन्सोडे, संचालक जयंत ढगे, कृषी विभाग प्रमुख किशोर हुलके आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच नरेश गेडेकर, गजानन उताणे, कपिल रांगणकर, संदिप एकरे, संदिप झाडे, प्रकाश निब्रड यांच्यासह मोठ्या संख्येने ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते.

error: Content is protected !!