Home सामाजिक बामणी येथे ग्रामीण भागातील गुणवंताचा सत्कार

बामणी येथे ग्रामीण भागातील गुणवंताचा सत्कार

620

बल्लारपूर तालुका मराठा सेवा संघाचे आयोजन

स्थापना दिनानिमित्त सामाजिक उपक्रम

बल्लारपूर : बल्लारपूर तालुका मराठा सेवा संघाच्या स्थापना दिनानिमित्त बामणी येथील सांस्कृतिक भवन सभागृहात ग्रामीण भागातील गुणवंताचा सत्कार समारंभ पार पडला. यावेळी शहीद भगतसिंग वाचनालय, बामणी व क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले अभ्यासिका विसापूर येथील स्पर्धा परीक्षेत यशस्वी झालेल्या गुणवंताचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

.        कार्यक्रमाचे उदघाटन बामणी येथील सरपंच प्रल्हाद आलाम यांच्या हस्ते क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले, राष्ट्रमाता जिजाऊ व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला मालार्पण करून करण्यात आले. यावेळी अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष दिपक खामनकर होते, तर प्रमुख अतिथी म्हणून चंद्रकांत वैद्य, बामणीचे उपसरपंच सुभाष ताजने, सामाजिक कार्यकर्ते सहदेव देरकर, वाजिद खान यांची उपस्थिती होती.

.       दरम्यान शहीद भगतसिंग वाचनालयाचे गुणवंत ज्ञानेश्वर मेश्राम, मोहीत गोरघाटे, धम्मदीप वाघमारे, मंगेश फरकडे, प्रतिक राजूरकर, गायत्री राऊत, चिरंजीवी मडावी, हर्शा राऊत, अंकीत बंसुले, सचिन जीवतोडे, भुवन देरकर, आदर्श देरकर, विसापूर येथील क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले अभ्यासिकेचे प्रज्वल धोटे, शुभम कांबळे, योगेश तांदूळकर यांनी उल्लेखनीय कामगिरी करून विविध आस्थापना मध्ये नोकरी प्राप्त केल्याबद्दल स्मृतिचिन्ह व पुस्तके प्रदान मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

.      प्रास्ताविक भाषणातून मराठा सेवा संघाचे तालुका अध्यक्ष सुरेश पंदीलवार यांनी सामाजिक बांधिलकीच्या उपक्रमांची माहिती विशद केली. मनोहर माडेकर, चंद्रकांत वैद्य, सुभाष ताजने यांनी मार्गदर्शनात मराठा सेवा संघाचे कार्य व वैचारिक शिक्षणांची भूमिका मांडली. संचालन तालुका सचिव नितीन वरारकर यांनी केले, तर आभार जिजाऊ ब्रिगेडच्या अध्यक्ष शोभा माडेकर यांनी मानले. यावेळी गणमान्य नागरिकांची उपस्थिती होती.

error: Content is protected !!