Home चंद्रपुर जिल्हा विशेष अर्धवट बंधाऱ्याच्या कामावरून नंदोरीकरांचे पदयात्रा आंदोलन

अर्धवट बंधाऱ्याच्या कामावरून नंदोरीकरांचे पदयात्रा आंदोलन

610

15 दिवसात निर्णय घ्या नाही तर तीव्र आंदोलन

आगामी निवडणुकीवर नंदोरी गावकऱ्यांचा बहिष्कार

चंद्रपुर / भद्रावती : तालुक्यातील नंदोरी येथील शीर नदीवरील बंधाऱ्याचे अपुरे बांधकाम तातडीने पूर्ण करण्यात यावे, भ्रष्टाचाराची चौकशी करून दोषींवर कारवाई व्हावी आणि नागरिकांना सुरक्षित पर्याय उपलब्ध करून द्यावा, या मागण्यांसाठी गुरुवारी सकाळी नंदोरी ते भद्रावती तहसील कार्यालयापर्यंत पदयात्रा आंदोलन करण्यात आले. शिवसेना नेते सुरज शहा यांच्या नेतृत्वाखाली झालेले हे आंदोलन मोठ्या संख्येने ग्रामस्थ, शेतकरी, महिला व विद्यार्थ्यांच्या सहभागामुळे यशस्वी ठरले.

.       तालुक्यातील नंदोरी येथील शीर नदीच्या पलीकडे इंदिरानगर वसाहत आहे. तर नंदोरी येथील अनेक शेतकऱ्यांच्या शेती नदी पड्‌याल आहे. येथील विद्यार्थी व नागरिकांना नदी ओलांडून नंदोरी गावात यावे लागते. तर नदी पलीकडे जाण्यासाठी शेतकऱ्यांना ही मोठी दमछाक करावी लागते. यामुळे या शीर नदीवर चांदा ते बांदा या योजनेतून बंधारा मंजूर झाला. त्याचे काम ही सुरु झाले. मात्र या बांधाऱ्याच्या कामाला काही कमिशन खोर नेत्यांची नजर लागली आणि बंधाऱ्याचे अर्धवट काम करुन कंत्राटदाराने पलायन केले. त्यानंतर प्रशासकीय अधिकारी आणि मंत्र्यांना निवेदने दिली मात्र काहीही झाले नाही. या उलट इंदिरा नगर वसाहतीतील कवडू येटे हा गुराखी घरी जात असताना नदीच्या प्रवाहात वाहून गेल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मात्र अजूनही प्रशासनाला जाग येत नसल्याने अखेर शिवसेनेचे सुरज शहा यांच्या नेतृत्वात गुरुवारी सकाळी 9 वाजता नंदोरी ते भद्रावती पदयात्रा आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात इंदिरानगर वसाहतीतील विद्यार्थी, लहान मुले, महिला, पुरुष व शेतकरी बैल बंडी, ट्रॅक्टर घेऊन उपस्थित राहिले.

.     भद्रावती तहसील कार्यालयात धडक देऊन आंदोलनकर्त्यांनी तहसीलदार राजेश भांडारकर यांना निवेदन सादर केले. यावेळी तहसीलदारांनी आंदोलनकर्त्यांसमोरच संबंधित अधिकाऱ्यांना आदेश देत बंधाऱ्याचे काम तातडीने सुरू करण्याचे निर्देश दिले. तसेच भ्रष्टाचार चौकशीची मागणी वरिष्ठ पातळीवर पाठवून दिली जाईल, असे स्पष्ट केले.

.    जर पुढील १५ दिवसांत काम सुरू झाले नाही तर लढा अधिक उग्र करण्यात येईल, असा इशारा आंदोलनकर्त्यांनी यावेळी दिला.

.    यावेळी नंदोरी ग्रामपंचायतचे सरपंच मंगेश भोयर, ग्रामपंचायत सदस्य किशोर उमरे, सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र जिवतोडे, भानुदास ढवस, दादा झाडे. शिवसैनिक सुमित हस्तक, हर्षल शिंदे, निलेश उरकुळे, भूषण जाधव, चंदू मडावी, युवासेना विधानसभा समन्वयक मुनेश्वर बदखल, राज चव्हाण, प्रशांत रामटेके, अमोल लेडांगे, रवींद्र वाटेकर, शंकर ठेंगणे, महेश उरकुडे, प्रज्वल एकरे व संपूर्ण गाववासी, महिला वर्ग, शेतकरी यांची उपस्थिती होती.

आगामी निवडणुकीवर नंदोरी गावकऱ्यांचा बहिष्कार

नंदोरी येथील शीर नदीवर अर्धवट असलेला बंधाऱ्याचे बांधकाम तातडीने सुरु करावे ही मागणी घेऊन नंदोरीकरांनी नंदोरी ते भद्रावती अशी पदयात्रा सकाळी काढत तहसीलदार यांना निवेदन दिले. यानंतर नंदोरी ग्रामपंचायत च्या वतीने गुरुवारी सायंकाळी 8 वाजता आमसभेचे आयोजन करण्यात आले. या आमसभे दरम्यान अर्धवट असलेला बंधारा आणि पांदन रस्ते या विषयावर चर्चा करण्यात आली. जो पर्यंत अर्धवट बंधाऱ्याचे काम पूर्ण होण्यासाठी निधी उपलब्ध होणार नाही तोपर्यंत होऊ घातलेल्या आगामी निवडणुकीवर नंदोरी गावकऱ्यांनी बहिष्कार टाकत या निवडणुकीत गावातून कोणीही उमेदवारी अर्ज भरणार नसल्याचा निर्णय घेत ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला.

भद्रावती तालुक्यात नंदोरी हे गाव राजकीय दृष्ट्‌या महत्वाचे गाव आहे. चार हजारापेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या गावाने निवडणुकीवर बहिष्कार टाकल्याने राजकीय वर्तुळत खळबळ माजली आहे. या आमसभेला मोठ्या प्रमाणात गावकरी उपस्थित होते.

 

error: Content is protected !!