सेवा पंधरवडा निमित्त विविध उपक्रम
विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती
बल्लारपूर : बल्लारपूर तहसील कार्यालयाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान अंतर्गत सेवा पंधरवडा साजरा केला जात आहे. या अनुषंगाने आज गुरुवार (दि. १८) रोजी तहसील कार्यालय प्रांगणात लोक अदालत आयोजित करण्यात आली. यावेळी विविध विभागांच्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्यांचा निपटारा करण्यात आला. यावेळी कळमना येथील शेतकरी अनील कोसरे यांचा बैल पुरात वाहून गेल्या बद्दल व बल्लारपूर येथील शेतकरी राजदत्त पाल यांचा पुरात मृत्यू झाल्याने वारसांना मदत देण्यात आली. दरम्यान तहसिलदार रेणुका कोकाटे यांनी प्रत्यक्ष विसापूर शेतशिवारात पाणंद रस्ते मोजणी केला.
. यावेळी परिविक्षाधीन उपजिल्हाधिकारी बालाजी कदम, तहसिलदार रेणुका कोकाटे, नायब तहसिलदार सतीश साळवे, भूमिअभिलेख उपअधिक्षक अनील देशमुख, नायब तहसिलदार महेंद्र फुलझेले, नायब तहसीलदार अजय मल्लेलवार, वीज वितरण कंपनीचे अधिकारी, गटविकास अधिकारी धनंजय साळवे, कोठारी व बल्लारपूर चे पोलीस अधिकारी, वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्या सह महसूल प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. लोक अदालत मध्ये प्रलंबित फेरफार नोंद, सातबारा दुरुस्ती, विविध विभागांच्या प्रलंबित तक्रारी, अर्ज व इतर नागरिकांच्या प्रलंबित प्रकरणाचा निपटारा करण्यात आला.


