मस्कऱ्या गणरायचे आगमन
नऊ वर्षांची परंपरा आजही कायम
चंद्रपुर : ‘एक गाव, एक गणपती’ ही एक अशी संकल्पना आहे, भद्रावती तालुक्यात असलेल्या धानोली गावातील सर्व नागरिक एकाच सार्वजनिक गणपतीची स्थापना करून उत्सव साजरा करीत आहेत. धानोली गावातील ग्रामस्थांनी स्वयंस्फूर्तीने ‘एक गाव, एक गणपती’ ही संकल्पना गेली अनेक वर्षापासून राबवत आहे. ही परंपरा गेल्या 9 वर्षांपासून सुरू आहे. बुधवार दि. 10 सप्टेंबर ला गणपतीची स्थापना करण्यात आली. ग्रामस्थांनी आपल्या या कृतीतून एक वेगळे अनुकरणीय पाऊल टाकत सर्वांपुढे आदर्शच उभा केला आहे.

. धानोली गावात 9 वर्षापासून सह्याद्री मस्कऱ्या गणेश मंडळ यांचे विद्यमाने “एक गाव एक गणपती” ही संकल्पना मोठ्या थाटात साजरी करण्यात येत आहे. या गावातील परंपरा अजूनही कायम असून सर्व धर्मीय नागरिक गावात सुरू असलेल्या या कार्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहतात.
. संकटचर्थुर्थी ला गणरायाचे आगमन करण्यात आले. यामध्ये सह्याद्री मस्कऱ्या गणेश मंडळ धानोली चे अध्यक्ष अमोल देरकर, सदस्य अमीर बोढे, गिरीधर धांडे, वैभव देरकर, सागर माडेकर, तुषार बोढे, गजानन खापणे, नितेश बोढे, शंकर ठेंगणे, आशिष काळे, शाहीर आमने, मयूर बोढे, नयन उपरे, ललित बोढे, अश्विन विधाते, गणेश कामटकर, हनुमान जांभूळकर, पंकज विधाते सह गावातील नागरिकांनी मोलाचे सहकार्य केले.


