ठाणेदारांचा वचक संपला
नागरिकांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
रवी खाडे
चंद्रपूर : “जनतेच्या सुरक्षेसाठी २४ तास सज्ज” ही फक्त पोलीस विभागाची टॅगलाईन राहिली आहे, प्रत्यक्षात वरोरा पोलीस ठाण्यात तक्रारदार पोलीस शोधत फिरतोय आणि पोलीस ठाणे मात्र रामभरोसे चालले आहे. होय हा प्रत्यय आला एका तक्रारदाराला. तक्रारदाराने सर्व खोल्यांमध्ये फेरफटका मारत व्हिडिओ रेकॉर्डिंग केले, आणि वरोरा पोलिसांची निष्क्रियता पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली.
![]()
. वरोरा पोलीस ठाण्याचा कारभार सध्या अक्षरशः रामभरोसे चालत असल्याचे धक्कादायक वास्तव पुन्हा एकदा उघड झाले आहे. मंगळवारी (दि. २ सप्टेंबर) पहाटे एक तक्रारदार तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात गेला परंतु, संपूर्ण ठाण्यात एकाही कर्मचाऱ्याचा पत्ता नव्हता. तक्रारदाराने सर्व खोल्यांमध्ये फेरफटका मारत व्हिडिओ रेकॉर्डिंग केले. यापूर्वीही काही महिन्यांपूर्वी एकही कर्मचारी पोलीस ठाण्यात नसल्याची संधी साधून खुणाच्या आरोपाखाली असलेल्या एका आरोपीने जुत्याच्या लेस च्या साहाय्याने पोलीस कोठडीतच आत्महत्या केली होती. या घटनेनंतर तत्कालीन ठाणेदार अमोल काचोरे यांची तडकाफडकी बदली झाली होती. त्यांच्या जागी रातोरात पोलीस निरीक्षक अजिंक्य तांबोडे यांची नियुक्ती करण्यात आली. मात्र तांबोडे यांच्या कार्यकाळात गुन्हेगारी आटोक्यात येईल, अवैध धंद्यांवर आळा बसेल, अशी अपेक्षा होती मात्र ती सुद्धा धुळीस मिळाली. या उलट वरोरा तालुक्यात चोऱ्या, सट्टापट्टी, बनावट दारू, मारामाऱ्या अशा गुन्ह्यांचा पाढा दिवसेंदिवस वाढत आहे. आणि कर्मचाऱ्यावर वचक ही नसल्याचे बोलल्या जाते. विशेष म्हणजे तांबडे यांना अनोळखी नंबर उचलन्यातही एलर्जी असल्याचे दिसून येते.
![]()
. वरोरा पोलीस ठाण्यात तक्रारी नोंदविण्याऐवजी “सेटलमेंट”ची प्रथा सुरू असल्याचा गंभीर आरोप होत आहे. काही दिवसांपूर्वी नंदोरी येथील एक युवक व त्याच्या आईला झालेल्या मारहाणीच्या घटनेतही हेच चित्र दिसून आले. पोलिसांनी पीडितांचे मेडिकल करूनसुद्धा तक्रार नोंदवली नाही. उलट, चार दिवसांनी आरोपींना बोलावून चिरीमिरी घेऊन त्यांना सोडून देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. अशा प्रकारे न्याय शोधत ठाण्यात जाणाऱ्या तक्रारदारांची थट्टा केली जात असल्याने जनतेत तीव्र संताप आहे.
![]()
ठाणेदारांचा वचक संपला तक्रारदाराने केलेल्या व्हिडिओ रेकॉर्डिंगवरून हे उघड झाले की ठाणेदार अजिंक्य तांबडे यांचा स्वतःच्या कर्मचाऱ्यांवर वचक उरलेला नाही. सुदैवाने घटनेच्या दिवशी पोलीस कोठडीत कोणीही नव्हते, अन्यथा गंभीर परिणाम घडला असता. सततच्या निष्क्रियतेमुळे ठाण्याची प्रतिमा खालावत आहे.
नागरिकांच्या सुरक्षेचे काय ? वरोरा पोलीस ठाण्यातील हे कारनामे आता नागरिकांच्या सुरक्षेलाच मोठा धोका निर्माण करत आहेत. तक्रारी दडपल्या जात असतील, आरोपींना संरक्षण दिले जात असेल, अवैध धंद्यांना ऊत येत असेल, तर वरोऱ्यात कायद्याचे राज्य उरले आहे का ? असा गंभीर सवाल नागरिकांतून उपस्थित होत आहे. दोषींवर तात्काळ कारवाई करून ठाण्याचा कारभार शिस्तीत आणावा, अशी जोरदार मागणी होत आहे.
योग्य ती चौकशी होईल ही फार गंभीर बाब आहे. पोलीस ठाण्यात सहा कर्मचारी दररोज रात्री सेवेत असतात. स्टेशन डायरी वर एक मदतनीस म्हणून एक, सिसिटीएस एक, डीओ एक आणि डीओ मदतनीस असे कर्मचारी कर्तव्यावर असतात. याबाबत आपण ठाणेदार व त्या दिवशी सेवेवर असलेल्या कर्मचाऱ्यांची विचारपूस करणार आहोत. आणि योग्य ती कारवाई होईल.
संतोष बाकल, पोलीस उपविभागीय अधिकारी, वरोरा


