वरोरा :गुंतवणूकीचे अनेक आधुनिक माध्यमे आपल्यासमोर आहे. त्याचा उपयोग करून विद्यार्थ्यांनी तरुण वयोगटात आर्थिक गुंतवणुकीचे महत्त्व ओळखणे आवश्यक आहे. शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंडामध्ये परतावा अधिक मिळतो,परंतु आपल्यासाठी योग्य पर्याय कोणता आहे,हे प्रथम ओळखणे आवश्यक आहे.तसेच शेअर मार्केटमध्ये रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होत आहे. प्रा. सागर तवर यांनी वरोरा येथे वाणिज्य आणि अर्थशात्र विभागाच्या वतीने शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंड या विषयावर व्याख्यान कार्यक्रमात बोलत होते.
. लोकशिक्षण संस्थेद्वारा संचालित, लोकमान्य महाविद्यालय, वरोरा येथे वाणिज्य आणि अर्थशात्र विभागाच्या वतीने शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंड या विषयावर व्याख्यान कार्यक्रम बुधवार, दि.03 सप्टेंबर 2025 ला आयोजित करण्यात आला.
. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयातील समाजशास्त्र विभागप्रमुख डॉ.श्रीनिवास पिलगुलवार होते.तर प्रमुख वक्ता म्हणून प्रा.सागर तवर (ट्रेनर,सेक्युरिटी मार्केट) होते.
. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. श्रीनिवास पिलगुलवार यांनी अध्यक्षीय समारोपातून कार्ल मार्क्स यांचे आर्थिक विचार, बदलती जीवनशैली,शासनाची भूमिका आणि वैयक्तिक आर्थिक जबाबदाऱ्या इत्यादी विषयाच्या अनुषंगाने मत मांडले.
. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.शास्त्रकार यांनी केले. प्रस्ताविक डॉ.रवींद्र शेंडे तर आभार प्रा.नेहा शेंडे यांनी मानले.या कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद आणि विद्यार्थ्यांचे खुप मोलाचे सहकार्य मिळाले.


