Home सामाजिक संस्कृतीचा समृध्द मार्ग जोपासण्यासाठी भजन मंडळांना सक्षम करण्याची गरज – आ.जोरगेवार

संस्कृतीचा समृध्द मार्ग जोपासण्यासाठी भजन मंडळांना सक्षम करण्याची गरज – आ.जोरगेवार

791

      लोकसेवक डॉ. सच्चिदानंद मुनगंटीवार यांच्या जयंती निमित्त भव्य भजन संमेलनाचे आयोजन     

 

चंद्रपूर 

.         डॉ. सच्चिदानंद मुनगंटीवार त्यांनी केलेली सेवा समाज कधीही विसरणार नाही. डॉक्टरी पेशात असणाऱ्या डॉ. सच्चिदानंद मुनगंटीवार यांनी ख-या अर्थाने रुग्णसेवा केली. आज त्यांच्या जयंती निमित्त आपण आयोजित केलेले भजन संमेलन त्यांना आपण वाहिलेली सर्वोत्तम आदरांजली आहेच सोबतच संस्कृतीचा समृद्ध मार्ग जोपासण्यासाठी भजन मंडळांना सक्षम करण्याचा संकल्प त्यांच्या जयंती दिनी आज आपण करुया असे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.

.         अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ गुरुकुंज आश्रम श्री गुरुदेव सेवा शहर शाखा चंद्रपूरच्या वतीने लोकसेवक डॉ. सच्चिदानंद मुनगंटीवार यांच्या जयंतीनिमित्त भव्य भजन संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी सर्वाधिकारी गुरुकुंज आश्रम मोझरीचे लक्ष्मणराव गमे , भागवताचार्य मनिषजी महाराज, गुरुकुंज आश्रम मोझरीचे उपसर्वाधिकारी दामोधर पाटील, गुरुकुंज आश्रम मोझरीचे प्रचार प्रमुख प्रकाश महाराज वाघ, प्रांताधिकारी विठ्ठलराव सावरकर, जिल्हा सेवाधिकारी अड. दत्ता हजारे, अशोक चरडे, जिल्हा प्रचार प्रमूख रुपलाल कावळे, जिल्हा प्रचार प्रमुख दादाजी नंदनवार, राम राउत, अंकुश आगलावे, डॉ. गोपाल मुंधडा, प्रेमलाल पारधी, अड. किरण पाल, वासुदेव सादमवार बबनराव धर्मपूरीवार आदी मान्यवरांची मंचावर उपस्थिती होती. या कार्यक्रमाला अनेक भजन मंडळांची व नागरिकांची उपस्थिती होती.

error: Content is protected !!