Home चंद्रपुर जिल्हा विशेष वीज पुरवठा सुरळीत करताना इसमाचा मृत्यू

वीज पुरवठा सुरळीत करताना इसमाचा मृत्यू

1000

नांदगाव (पोडे) येथील घटना

महावितरण चा भोंगळपणा पडला उघडा

बल्लारपूर : तालुक्यातील नांदगाव (पोडे) येथील एक वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी वीज खांबावर चढला. दरम्यान त्याला विजेचा जबरदस्त धक्का बसला. त्यावेळी तो उंचावरून खाली पडला. खाली पडल्याने गंभीर जखमी झाला. त्याला उपचारार्थ चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलविले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. ही घटना सोमवार (दि. २१) जुलै रोजी रात्री ८ वाजता बल्लारपूर तालुक्यातील नांदगाव (पोडे) घडली. या घटनेमुळे महावितरण कंपनीचा भोंगळपणा उघडा पडला. मृतकाचे नाव मारोती दिनकर निब्रड (34) रा. नांदगाव पोडे, ता. बल्लारपूर असे आहे.

.      मारोती निब्रड हा वीज वितरण कंपनीतील एका लाईनमन कडे कामाला रोजीने जात होता. तो लाईनमनने सांगितलेले काम करायचा. अशातच काल सोमवारी नांदगाव (पोडे) गावातील वीजपुरवठा खंडित झाला होता. गावातील काहींनी लाईनमनला सूचना दिली. मात्र गावातील वीजपुरवठा सुरू करण्यासाठी मारोती निब्रड जनित्र तपासणी साठी गेला होता.
माना,चारवट व हडस्ती गावातील देखील वीज पुरवठा खंडित झाला होता. नेहमी लाईनमन सोबत काम करत असल्याने मारोती निब्रड ला वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी सांगत होते. मात्र त्याचे कडे कोणतेही सुरक्षा साधन नव्हते.परिणामी मारोती चा हकनाक बळी गेल्याची भावना गावकऱ्यांनी व्यक्त केल्या. घटनेचे गांभीर्य ओळखून बल्लारपूर वीज वितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता कातकर,शाखा अभियंता शशिकांत कुकडे यांनी भेट दिली. त्यावेळी गावकऱ्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले.मृतकाच्या कुटुंबाला नुकसान भरपाई देण्याची मागणी केली.

” नांदगाव (पोडे) येथील मारोती निब्रड हा महावितरण कंपनीचा कोणताही कर्मचारी नव्हता. मात्र वीज तंत्री असल्याने मारोती कडून वीज पुरवठा सुरु करण्यासाठी लाईनमन सेवा घेत होते. विजेचा जबरदस्त धक्का बसल्याने त्याचा जीव गेला. त्याच्या कुटुंबाला नुकसान भरपाई देण्यात यावी. ”                                                                                                                                                                      राजेंद्र वैद्य,                                                            अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, चंद्रपूर. 

error: Content is protected !!