वरोरा
. वरोरा वनपरिक्षेत्र यांच्या संयुक्त विद्यमाने टेमुर्डा येथे उपवनपरिक्षेत्रच्या विश्रामगृहाच्या पटांगणावर वन्य जीव सप्ताहाचे भव्य आयोजन करण्यात आले होते.
. १ ऑक्टोंबर ते ७ ऑक्टोंबर दरम्यान विविध वन्य प्राण्याच्या कला कृतीने व प्रत्यक्षिकाने व जनजागृतीने परिसर दुमदुमून गेला होता तर ७ ऑक्टोंबर ला या वन्यजीव सप्तहाची भव्य रॅली वन विभागाच्या वाहनद्वारे हॅलो जिंग वरून घोषणा देत काढण्यात आली यामध्ये येथील संततुकडोजी कनिष्ठ महाविद्यालयाचे शेकडो विद्यार्थी शिक्षक कर्मचारी शेतकरी व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
. या कार्यक्रमाचे अध्यक्ष वरोरा वनपरिक्षेत्राचे क्षेत्र अधिकारी सतीश शेंडे हे होते तर प्रमुख मार्गदरशक सामाजिक कार्यकर्ते छोटू शेख हे होते तर प्रमूख उपस्थिती म्हणून संत तुकडोजी कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक एम. एस खापणे, पत्रकार प्रवीण खिराटकर, सामाजिक कार्यकर्ते किशोर डुकरे, संदीप वासेकर , निखिल तिखट, अनिकेत झिले, उपवनविभाग परिक्षेत्र कार्यालयाचे वनपाल डी. बी. चांभारे, तसेच, उपवन विभाग कार्यालयाचे सर्व कर्मचारी,, पोलीस पाटील पंढरी देवगळे व आदी मान्यवर उपस्थित होते.
. यावेळीं उपस्थित मान्यवरणी वन्य प्राण्याच्या जीवनावर प्रकाश टाकला कार्यक्रमाचे वृत्तसंचालन (वनरक्षक) अमोल नवारे यांनी केले तर आभार प्रदर्शन (वनरक्षक) दिशा अंभाडरे यांनी मांडले.
. हा वन्यजीव सप्ताहा यशस्वी करण्याकरिता येथील वन रक्षक गौरव दीपक केचकर वनरक्षक ऐन. के.करकाडे (वनरक्षक) बडीराम कान्हा लोणकर वनरक्षक एम .डी. खोकारे वनपाल टी .एम.धुमने येथील संजय खोब्रागडे, अमोल तिखट, संतोष वेदांती वनरक्षक येथील वन विभाग कार्यल्याचे कर्मचारी सहायक कामगार यांनी भरीव सहकार्य केले.


