घुग्घूस : धारिवाल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड आणि पहेल मल्टीपर्पज सोसायटी, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद शाळा, अंतुर्ला येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.
शिबिराचा मुख्य उद्देश ग्रामीण भागातील नागरिकांना त्यांच्या दैनंदिन धकाधकीच्या जीवनातही सुलभ, मोफत व दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे हा होता. हा उपक्रम देवेश कुमार, मुख्य महाप्रबंधक, धारिवाल यांच्या नेतृत्वाखाली पार पडला.
. कार्यक्रमाला डॉ. अनिश नायर, मुख्य व्यवस्थापक, धारिवाल, ज्ञानेश्वर लांडगे धारिवाल, अनिता जोगी, उपसरपंच अंतुर्ला, आवडती फुलझेले, माजी सरपंच सुमन चांदेकर, आशा वर्कर सुनीता फुलझेले, वसंत लिपटे, मुख्याध्यापक, जि.प. शाळा अंतुर्ला या उपक्रमात एकूण ८९ नागरिकांनी आरोग्य तपासणी करून औषधोपचाराचा लाभ घेतला.
. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिनेश कामतवार यांनी केले तर आभार सेजल चांदेकर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी माधुरी श्रीवास्तव, आशिष हलगे, पूजा वानखेडे, ज्योती तानकर, गाव विकास ग्रुप, अंतुर्ला या उपक्रमामुळे गावकऱ्यांना प्राथमिक आरोग्य सुविधा मिळाल्यामुळे समाधान व्यक्त करण्यात आले आहे. पुढील काळात असेच उपक्रम सातत्याने राबवले जावेत, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली.

