Home सामाजिक टेमुर्डा येथे कृषी पंप, शालेय साहित्य वाटप व रक्तदान शिबिराचे आयोजन

टेमुर्डा येथे कृषी पंप, शालेय साहित्य वाटप व रक्तदान शिबिराचे आयोजन

847

माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या वाढदिवसाचे औचित्य

चंद्रपूर : शेतकऱ्यांच्या प्रश्नांप्रती संवेदनशील दृष्टिकोन ठेवणारे माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या वाढदिवसानिमित्त ५ जुलै २०२५ रोजी एक सामाजिक उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. टेमुर्डा येथे दुपारी 12 वाजता आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना कृषी पंप, विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

.            वरोरा तालुक्यातील टेंमुर्डा ग्रामपंचायत भवन येथे दुपारी १२ वाजता हा कार्यक्रम पार पडणार असून, एक जानेवारी २०२४ नंतर आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना या उपक्रमांतर्गत कृषी पंप वाटप करण्यात येणार आहे. यासोबतच त्या शेतकऱ्यांच्या पाल्यांना शालेय साहित्याचे वाटप करून त्यांच्या शिक्षणाला हातभार लावण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील शिक्षणास आणि शेतकरी कुटुंबांच्या सक्षमीकरणास चालना देणारा हा उपक्रम म्हणून या उपक्रमाकडे पाहिले जात आहे.

.         सामाजिक बांधिलकी जपत या दिवशी रक्तदान शिबिराचे आयोजन देखील करण्यात आले आहे. रक्तदान हीच खरी मानवसेवा या भावनेतून अनेक कार्यकर्ते आणि नागरिक या शिबिरात सहभाग घेणार आहेत.

.         या कार्यक्रमामध्ये पत्रकारांचा विशेष सत्कार करून त्यांच्या समाजासाठीच्या योगदानाला मान्यता देण्यात येणार आहे. शेतकरी नेते तथा सामाजिक कार्यकर्ते किशोर डुकरे यांनी या उपक्रमाचे आयोजन केले असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सामाजिक कार्यात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

error: Content is protected !!