Home सामाजिक डॉ. सुरेश कोल्हे यांची ४७ वर्षांची अविरत रुग्णसेवा पूर्ण

डॉ. सुरेश कोल्हे यांची ४७ वर्षांची अविरत रुग्णसेवा पूर्ण

778

घुगुस : येथील ज्येष्ठ वैद्यकीय सेवक डॉ. सुरेश कोल्हे यांनी २ जुलै २०२५ रोजी आपल्या रुग्णसेवेचा ४७ वर्षांचा टप्पा पूर्ण केला. ही त्यांची अविरत व निस्वार्थ सेवा केवळ वैद्यकीय क्षेत्रातच नव्हे, तर समाजातही एक प्रेरणादायी उदाहरण ठरली आहे.

.       डॉ. कोल्हे यांनी २ जुलै १९७८ रोजी एम.बी.बी.एस. पदवी पूर्ण केल्यानंतर घुग्घूसमध्ये वैद्यकीय सेवा सुरू केली. त्या काळात घुग्घूस हे एक औद्योगिक शहर असले तरी येथे आरोग्य सुविधांची प्रचंड कमतरता होती. अशा परिस्थितीत त्यांनी आपले मूळ गाव सोडून घुग्घूसमध्येच स्थायिक होण्याचा निर्णय घेतला आणि रात्रंदिवस रुग्णसेवेत स्वतःला झोकून दिले.

.      गावातील गरिब व गरजू रुग्णांसाठी डॉ. कोल्हे हे एक आश्वासक नाव ठरले. रात्री अपरात्री येणाऱ्या रुग्णांची सेवा, सोयी-सुविधांचा अभाव असूनही दिलेला वैद्यकीय उपचार, आणि समाजात निर्माण झालेला विश्वास यामुळे त्यांची ओळख एक तळमळीचा डॉक्टर म्हणून झाली. आजही ही सेवा अखंड सुरू असून त्यांच्याच प्रेरणेने त्यांचे सुपुत्रही वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत आहेत. डॉ. ऋषिकेश कोल्हे (एम.डी. पॅथॉलॉजी) आणि डॉ. नचिकेत कोल्हे (एम.डी. मेडिसिन) हे दोघेही वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत सेवाकार्य करत आहेत.

.       या ४७ वर्षांच्या अखंड सेवेसाठी डॉ. कोल्हे यांच्यावर समाजाच्या सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत असून त्यांच्याविषयी कृतज्ञतेची भावना व्यक्त केली जात आहे.

error: Content is protected !!