आमदार देवराव भोंगळे यांचे शब्द व महेश देवकते यांचा सततचा पाठपुरावा
फारुख शेख
जिवती : कोरपना तालुक्यातील नारंडा येथील दालमिया सिमेंट कंपनी येथे दोन वाहनामध्ये दबून दिनांक 04 एप्रिल 2025 रोजी कदम ट्रान्सपोर्ट, जिवती येथील चालक नामे प्रकाश बळीराम राठोड यांचा दालमिया सिमेंट कंपनी नारंडा येथे अपघाती निधन झाले.
. यामध्ये दालमिया सिमेंट कंपनी यांनी आपले हात झटकत झालेला अपघात कंपनी मध्ये झालाचं नाही, असे खोटं सांगत पूर्णपणे बाहेर पडली होती, माञ चालक स्व. प्रकाश राठोड यांची गाडी लोड होऊन तो वजन काटा येथे गाडी नेत असतांना हा अपघात झाला असे घटनेची पाहणी दरम्यान निष्पन्न झाले, कारण ट्रान्सपोर्ट मालक यांच्या लोकेशन नुसार गाडी लोड झाली अकॉउंट मधील रक्कम कपात झाली व तेथील सिक्युरिटी यांच्या हलगर्जीपणामुळे प्रकाश यांच्या मृत्यू झाला, शेवटी कंपनी हा अपघात मान्य करायला तयारचं झाली नाही.
. भारतीय जनता युवा मोर्चा चंद्रपूर चे जिल्हा अध्यक्ष महेश देवकते व तालुका महामंत्री तथा जिवती शहर संघटक गोविंद टोकरे यांनी पुढाकार घेऊन, कंपनीला धारेवर धरले. मृतक व्यक्तीच्या कुटुंबियांना आर्थिक मदत आणी परिवारातल्या एका सदस्यला कंपनीत नोकरी मिळाल्याशिवाय आम्ही अंत्यसंस्कार करणार नाही अशी ठाम भूमिका बजावली.
. सर्व घडलेला प्रकार राजुरा विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार देवराव भोंगळे यांना सांगितल्या नंतर लगेच अॅक्शन घेऊन कंपनीचे हेड यांच्या सोबत फोनवर वार्तालाभ करून समझोता केला, या मध्ये मृतक प्रकाश राठोड यांना 19 लाख रुपये व कुटुंबातील एका व्यक्तीस कंपनी मध्ये नोकरी देण्याचे समझोता झाला, यामध्ये कंपनी यांनी प्रकाश यांच्या अंत्यविधीकरीता रोख 50 हजार नगदी स्वरूपात दिले होते.
![]()
. त्यानंतर उर्वरित रक्कम 18,50,000/- मिळण्याकरिता जिल्हा अध्यक्ष महेशभाऊ देवकते यांच्या सतत पाठपुरावा चालू होता व कंपनी मान्य करून दिनांक 16 जून 2025 रोजी आमदार देवराव भोंगळे यांच्या राजुरा येथील जनसंपर्क कार्यालय येथे येऊन आमदार देवराव भोंगळे यांच्या हस्ते राहिलेली पूर्ण रक्कम धनादेश स्वरूपात प्रकाश राठोड यांची आई व त्याची पत्नी व मुले यांच्या कडे 18 लाख 50 हजाराचा धनादेश स्वाधीन केले. त्याच बरोबर मृतक व्यक्तीचि मोठी मुलगी सध्या अकरावी वर्गात शिकत असून तिचे शिक्षण पूर्ण होऊन तिचे अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर तिच्या शिक्षणाच्या योग्यतेनुसार तिला कामावर घेण्याचा तसा करारनामा कंपनीकडून लिहून घेण्यात आला.
. धनादेश स्वीकारतांना स्व. प्रकाश राठोड यांच्या आईला व पत्नीला अश्रू अनावर झाले. धनादेश स्वाधीन करतांना सोबत महेश देवकते जिल्हा अध्यक्ष भा. ज. यु. मोर्चा तालुका अध्यक्ष भाजपा जिवतीचे दत्ता राठोड, भाजपा शहराध्यक्ष जिवती राजेश राठोड, तालुका महामंत्री तथा जिवती शहर संघटक गोविंद टोकरे, वैजनाथ कदम, गणेश राठोड, तुकाराम वारलवाड, आनंद कदम, अक्षय सोलनकर, धोंडिबा जाधव, राहुल राठोड, अर्जुन राठोड आदी कार्यकर्ते उपस्थित होते. मृतक प्रकाश राठोड यांचे भावजी प्रभूदास व प्रकाश यांचे सासरे आमदार देवराव भोंगळे व महेश देवकते यांचे मनःपूर्वक आभार मानले.


