Home विशेष ग्रामपंचायत परिसरात अतिक्रमणाचा विळखा!

ग्रामपंचायत परिसरात अतिक्रमणाचा विळखा!

835
  • ग्रामस्थांनी महेंद्र दरणे यांच्या दादागिरीविरोधात केली संतप्त तक्रार
  • सरकारी जागेवर अवैध बांधकाम व अडथळ्यामुळे नागरिक त्रस्त

वर्धा : जिल्ह्यातील देवळी तालुक्यातील ग्रामपंचायत टाकळी (दरणे) परिसरात महेंद्र दरणे या व्यक्तीने केलेल्या अवैध बांधकामामुळे ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. याबाबत नरेंद्र भोयर व गावातील नागरिकांनी संयुक्तपणे ग्राम सेवक व प्रशासक यांना निवेदन सादर करून त्वरित कारवाईची मागणी केली आहे.

.        महेंद्र दरणे हे कोणतेही अधिकृत पद नसताना दिवसभर ग्रामपंचायत कार्यालयात उपस्थित राहतात, तसेच ग्रामपंचायतीच्या कामांमध्ये अडथळा निर्माण करतात, असा आरोप नागरिकांनी केला आहे. त्यांची वाहने, ट्रॅक्टर आणि साहित्य हे कार्यालयासमोरील जागेत दिवसन्‌दिवस अडथळा ठरू लागले आहे. यामुळे ग्रामपंचायतीकडे येणाऱ्या नागरिकांना व प्रशासकीय कामकाजात अडथळा निर्माण होतो, अशी तक्रार करण्यात आली आहे.

.        ग्रामस्थांचे म्हणणे आहे की, या व्यक्तीची पत्नी काही वर्षांपूर्वी सरपंच होती, मात्र त्याकाळात गावात एकही चांगला रस्ता झाला नाही. सध्याही रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय आहे.

.        महेंद्र दरणे यांच्यावर यापूर्वीही गुन्हे दाखल झाले असून एका शासकीय कर्मचाऱ्यावर मारहाण केल्याचा आरोपही आहे. त्यामुळे त्यांच्या वर्तनामुळे संपूर्ण गाव भयभीत आहे.

.        “या अवैध बांधकामावर त्वरित कारवाई न झाल्यास गावकरी तीव्र आंदोलन करतील,” असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे. ग्रामस्थांनी ग्रामपंचायत परिसर मोकळा करून देण्याची व महेंद्र दरणे यांना ग्रामपंचायतीमध्ये अनावश्यकपणे वावरण्यास प्रतिबंध घालण्याची मागणी केली आहे.

error: Content is protected !!