Home पोलीस डायरी दानपेटीवर ताव मारणारे दोन चोरटे पोलीसांच्या जाळ्यात

दानपेटीवर ताव मारणारे दोन चोरटे पोलीसांच्या जाळ्यात

856

वरोरा पोलीसांना यश

पांझुर्णी येथील मंदिरातील चोरी प्रकरण

वरोरा : तालुक्यातील पांझुर्णी येथील श्री सद्‌गुरु जगन्नाथ बाबा देवस्थान व माँ. भवानी माँ. गंगाई माता मंदिरातील दानपेटीवर आठ दिवसाच्या फरकाने चोरट्यानी ताव मारला होता. वरोरा पोलिसांनी तपासचक्र वेगाने फिरवीत दोन चोरट्याना जेरबंद करण्यात वरोरा पोलिसांना यश आले आहे. प्रिनल सुरेश वरभे (२५) व सुरज गजानन देवतळे (26) दोघेही रा. माढेळी असे आरोपीची नावे आहेत.

.      वरोरा तालुक्यात चोरट्यानी चांगलाच धुमाकूळ घातला आहे. दुकाने, घरफोडी, सह चोरट्यानी आता मंदिराची दानपेटी सुद्धा सोडली नाही. दि. 8 मे रोजी मध्यरात्री चोरट्यानी वरोरा माढेळी मार्गांवरील पांझुर्णी येथील श्री सद्‌गुरु जगन्नाथ बाबा देवस्थान मंदिरातील दानपेटी फोडली. त्यातील रक्कमेची चोरी करून चोरटे पसार झाले. त्यावरून पोलीस स्टेशन वरोरा येथे अज्ञात चोरट्याविरुद्ध अप क.३०६/२०२५ कलम ३३१ (४), ३०५ (अ) भा. न्या. संहीता २०२३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आठ दिवसाच्या फरकाने दि. 15 मे रोजी मध्यरात्री माँ. भवानी माँ. गंगाई माता मंदीर पांझूर्णी येथे ही दानपेटीतील रकमेची चोरी झाली होती त्यावरून पो.स्टे. वरोरा येथे अप क.३२०/२०२५ कलम ३३१ (४), ३०५ (अ) भा. न्या. संहीता २०२३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. दोन्ही घटनेतील अज्ञात आरोपीविरुद्ध विविध कलमान्वये पोलीस स्टेशन वरोरा येथे गुन्हे दाखल करण्यात आले होते.

.      सदर गुन्हे दाखल होताच वरोरा पोलीसांनी तपासाचे चक फिरवून गोपनिय माहीती काढून आरोपी प्रिनल सुरेश वरभे, सुरज गजानन देवतळे दोन्ही राहणार माढेळी ता. वरोरा जि. चंद्रपूर यांना दिनांक १६ मे रोजी ताब्यात घेवून गुन्हया संबंधाने चौकशी केली असता, दोन्ही आरोपींनी दोन्ही मंदीरात चोरी केल्याचे निष्पन्न झाल्याने दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे.

.     सदरची कारवाई पोलीस अधिक्षक चंद्रपूर, अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रपूर, सहायक पोलीस अधिक्षक तथा पोलीस उपविभागीय अधिकारी, वरोरा नयोमी साटम तसेच पोलीस ठाणे वरोराचे ठाणेदार अजिंक्य तांबडे यांचे मार्गदर्शनामध्ये, सहाय्यक पोलीस निरीक्षक. शरद भस्मे, पो.अं. संदीप मुळे, पो. अं. विशाल राजुरकर, पो.अं. मनोज ठाकरे यांनी केली.

error: Content is protected !!