Home सामाजिक खेमजई येथे खो-खो निवासी उन्हाळी शिबिर संपन्न

खेमजई येथे खो-खो निवासी उन्हाळी शिबिर संपन्न

903

वरोरा : जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा खेमजई तथा ग्रामस्थ खेमजई यांच्या संयुक्त विद्यमाने 3 ते 12 मे दरम्यान खो-खो उन्हाळी शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात 16 गावातील 127 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या शिबिरात वर्ग 5 ते 12 वी च्या 65 मुली आणि 62 मुलांनी सहभाग नोंदवून निवासी शिबिर यशस्वीरित्या पूर्ण केले.

.       हे शिबिर दोन सत्रात पार पडले यात रनिंग, वार्मअप खो खो मनोरंजन, बौद्धिक, भावात्मक खेळ यांनी सुरु व्हायचे. या शिबिरातून विद्यार्थ्यांना खो-खो या खेळातून शिस्त, चपळता , संघभावनेचे महत्त्व, फिटनेस शिकायला मिळाले. खेळाबरोबरच या शिबिरातून स्वावलंबन, संघभावना, सहकार्य ,समन्वय, नेतृत्व शिकले. हे शिबिर यशस्वी करण्यासाठी समस्त ग्रामस्थ खेमजई यांनी मोलाचा सहभाग घेतला.

.         हे शिबिर यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायत खेमजईच्या योगदान आहे. गुरुदेव सेवा मंडळ, खेमजई, ग्रामविकास समिती केंद्र आणि बिरसा क्रीडा मंडळ खेमजई, विकास ग्रुप खेमजई यांचे सुद्धा योगदान लाभले. या शिबिरातून खूप चांगले खेळाडू तयार होतील आणि भविष्यामध्ये ते आपलं, आपल्या शाळेचे, आपल्या गावाचे आपल्या जिल्ह्याचे, राज्याचे नाव निश्चितच उंचावेल .अशा लक्षवेधी विद्यार्थ्यांमधून काही शिबिरार्थीची उत्कृष्ट शिबिरार्थी म्हणून निवड करुन त्यांचा सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.उत्कृष्ट शिबिरार्थी म्हणून जास्मिनी वाकडे खेमजई, आर्यन विधाते पानवडाळा, राखी ढवस जामनी, करण बोढे वरोरा, याचा सन्मान करण्यात आला तर बेस्ट ऑफ द बेस्ट शिबिरार्थी हा पुरस्कार मुलींमधून श्रुती काळमेघे खेमजई हीला तर मुलांमधून आदित्य गजभे खेमजई याने पटकाविला. गटशिक्षणाधिकारी ज्ञानेश्वर सहारे, यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.

.      कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अक्षरा चंद्रहास मोरे या शिबिरार्थीने व आभार प्रदर्शन भाविका विलास घरत या शिबिरार्थीने केले. शिबिरात दहाही दिवस कोचिंग, प्रशिक्षण, मार्गदर्शक म्हणून सुधीर कुंभारे राष्ट्रीय खो खो पंच, स्वप्निल सायंकार राज्य अथलेटिक पंच व अनिकेत पाटील खो-खो प्रशिक्षक यांनी परीश्रम घेतले.

error: Content is protected !!