Home सामाजिक तथागत बुद्धांचा धम्म मानव कल्याणाचा

तथागत बुद्धांचा धम्म मानव कल्याणाचा

904

विसापूर येथे बुद्ध जयंती कार्यक्रमात मान्यवरांचे मार्गदर्शन

गुणवंत व सामाजिक कार्यकर्त्यांचा सत्कार समारंभ

बल्लारपूर : तथागत बुद्ध जीवनात वैशाख पौर्णिमेचे अनन्य साधारण महत्त्व आहे. याच दिवशी तथागत बुद्धाला ज्ञान प्राप्त झाले. महानिर्वाण झाले. बुद्धत्व प्राप्त झाले. त्यांनी याच बळावर जगाला मानव कल्याणाचा धम्म दिला.या धम्माला राजाश्रय मिळाल्याने जगभरात सम्राट अशोक यांच्या माध्यमातून पसरला.तथागत बुद्धांचा धम्म मानव कल्याणाचा आहे, असे प्रतिपादन विसापूर येथे मान्यवरांनी केले.

.      बल्लारपूर तालुक्यातील विसापूर येथील भारतीय बौद्ध महासभा व भीमशक्ती युवा मंचाच्या वतीने स्थानिक धम्मभूमी परिसरात रविवार व सोमवार रोजी तथागत बुद्ध जयंती महोत्सव आयोजित करण्यात आले.यावेळी मान्यवरांचे हस्ते गावातील गुणवंत विद्यार्थी व सामाजिक कार्यात योगदान देणाऱ्या कार्यकर्त्यांचा स्मृतीचिन्ह, पंचशील ध्वज व पुष्पगुच्छ प्रदान करून सत्कार करण्यात आला.

.      कार्यक्रमाचे व भारतीय बौद्ध महासभा नामफलकाचे उदघाटन विज वितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता अरविंद कातकर यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी अध्यक्षस्थानी चंद्रपूर जिल्हा भारतीय बौद्ध महासभा अध्यक्ष किशोर तेलतुंबडे होते. प्रमुख अतिथी म्हणून नागपूर येथील बेसिक फाऊंडेशनचे संस्थापक दिनेश पुणेकर, अशोक घोटेकर, नेताजी भरणे, सुजाता लाटकर, विसापूरचे उपसरपंच अनेकश्वर मेश्राम, ॲड.रमण पुणेकर, भारतीय बौद्ध महासभा शाखा अध्यक्ष संजय वानखेडे, सचिव सचिन पुणेकर आदींची उपस्थिती होती.

.      दरम्यान गुणवंत विद्यार्थी बादल धोटे, रंजना पाझारे, डॉ. मयुरी देठे, डॉ. समिक्षा सोरते, डॉ. निलम टिपले, कुणाल करमनकर, प्रतिक वनकर, गतीमान दुबे, शोभा परेकार आणि सामाजिक कार्यात योगदान देणारे संगीता करमनकर, शिला नगराळे, वंदना पाटील, वंदना पुणेकर, किरण वैद्य, पी.एल.शेंडे आदींचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

.      यावेळी दिनेश पुणेकर म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या विश्वासाने आधुनिक भारताचे स्वप्न पाहिले. ते भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून साकार होत आहे. तत्कालीन केंद्र सरकारने त्यांच्या जाहीरनाम्यातील देशाच्या विकासासाठी २0 सुत्री कार्यक्रमात समावेश केला. म्हणून आजही आजचा भारत विकासाच्या दिशेने वाटचाल करत आहे, असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय वानखेडे यांनी केले. संचालन पालिता उमरे यांनी केले. आभार सचिन पुणेकर यांनी मानले. यावेळी समाज बांधवांची उपस्थिती मोठ्या संख्येने होती.

सांस्कृतिक कार्यक्रमाची होती मेजवानी                                                                                                                                               विसापूर येथील तथागत बुद्ध जयंती महोत्सव निमित्त बुद्धभूमी परिसरात दोन दिवसाच्या कार्यक्रमात सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी दिली. पहिल्या दिवशी अनिकेत दुर्गे यांचा बुद्ध भीम गीतांचा बहारदार कार्यक्रम पार पडला. बौद्ध जयंती निमित्त दुसऱ्या दिवशी डॉ. भीमलाल साव यांचा संमोहन कार्यक्रम मनोरंजन करणारा ठरला.गायत्री रामटेके यांचा एकपात्री नाट्य प्रयोग ‘मी रमाई बोलतोय’ अंतर्मुख करणारा ठरला. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी विजय पाझारे, दिलदार जयकर, किरणकुमार पुणेकर, आकाश पाझारे, अविनाश वाघमारे, सचिन जीवने, अमोल डोंगरे, अरूण जगताप, सोहन जीवने, प्रथम दुपारे आदींनी परिश्रम घेतले.

error: Content is protected !!