निकालाची टक्केवारी घसरली
यंदाही मुलींनी बाजी मारली
चंद्रपूर : जिल्ह्यात यंदा दहावीचा निकाल ८८.४५ टक्के लागला आहे. गतवर्षीच्या तुलनेत निकालात ५.०९ टक्क्यांनी घसरण झाली आहे. गतवर्षी दहावीचा निकाल ९३.५४ टक्के लागला होता. दरवर्षीप्रमाणे यंदाही मुलींनी बाजी मारली.
. मुलींची टक्केवारी ९२.५१ टक्के एवढी आहे. यंदा ३ हजार १३५ विद्यार्थी नापास झाले आहेत. गतवर्षी केवळ १८१० विद्यार्थी नापास झाले हाेते. दहावी परीक्षेला चंद्रपूर जिल्ह्यातून नोंदणी केलेल्या एकूण २७ हजार ४१८ पैकी २७ हजार १६० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. या परीक्षेत ११ हजार ९९९ मुले तर १२ हजार २६ मुली असे एकूण २४ हजार २५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. जिल्ह्यात १२५ परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा झाली. यंदाही मुलांपेक्षा सरस असल्याचे पुन्हा सिद्ध करून दाखविले आहे. मुलींची टक्के ९२.५१ टक्के तर मुलांची टक्केवारी ८४.७३ टक्के एवढी आहे. दहावी परीक्षेचा एकूण निकाल ८८.४५ टक्के लागला आहे.

99%
सीबीएसई
कुचना कॉलनी
केंद्रीय विद्यालय न्यू माजरी

शर्विल विलास रेवते 90.60 %
तालुकानिहाय निकालाची टक्केवारी चंद्रपूर ९०.८५, बल्लारपूर ८८.९३, भद्रावती ८६.५६, ब्रह्मपुरी ८७.३७, चिमूर ८३.०४, गोंडपिपरी ९०.१५, कोरपना ८९.५०, मूल ८८.८६, नागभीड ८४.३४, पोंभुर्णा ९२.७०, राजुरा ९१.८६, सावली ८४.४३, सिंदेवाही ८७.६४, वरोरा ८९.७०, जिवती ९२.४६.
स्नेहल महेश रामगीरवार चंद्रपूर जिल्ह्यात प्रथम राज्य बोर्डच्या निकालात शिवाजी विद्यालय राजुराची विद्यार्थिनी स्नेहल महेश रामगीरवार (98.40) गुण घेऊन चंद्रपूर जिल्हा मध्ये प्रथम आली. भारत चौक राजुरा येथील घरी जाऊन सत्कार करन्यात आला या प्रसंगी आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ राजुरा या संस्थेचे सचिव अविनाश जाधव, कोश्याध्यक्ष साजिद बियाबानी, वडील महेश रामगीरवार, प्राचार्य डाँ. एस. एम. वारकड, आई शिवाती रामगीरवार, शिवाजी विद्यालय राजुराचे मुख्यद्यापक देविदास भोयर उपस्थित होते. स्नेहल रामगीरवार हिने सांगितले की आयएटी ही एंट्रन्स परीक्षा देऊन भारतातील सात आयझर कॉलेज मधील एका मध्ये मला प्रवेश मिळवायची आहे यात फॉरेन्सिक रिसर्च स्टडी करावयाचे आहे या सोबत जेईई आणि नीट परीक्षेची तयारी करावयाची आहे.


