Home सामाजिक सरडपार येथे बाल सुसंस्कार शिबीराचे आयोजन

सरडपार येथे बाल सुसंस्कार शिबीराचे आयोजन

904

नेरी : चिमुर तालुका ग्राम जयंती प्रचार व प्रसार समितीचे वतीने व श्री गुरुदेव सेवा मंडळ सरडपार चे सहकार्याने नेरी जवळील सरडपार येथे 3 मे ते 10 मे पर्यंत आठ दिवशीय बाल सुसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

.      मागील दोन वर्षांपासून सरडपार येथे शिबीराचे आयोजन केल्या जात असून अनेक बालकांनी आतापर्यंत भाग घेतला होता. या वर्षी सुद्धा मोट्या उत्साहाने दि ३ मे ते १० मे आठ दिवसीय निवासी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये मुलांना सुसंस्कार, बौद्धिक, लाठि, काठी, ज्युडो कराटे, योगा प्राणायाम, सामु. प्रार्थना, ध्यान, थोरांचे चरीत्र, सात्विक जीवन इत्यादी विषय शिकविल्या जाणार आहे. तसेच विविध विषयांवर अनेक अभ्यासक मान्यवर मार्गदर्शन करतात. तरी चिमुर तालुक्यातील इच्छुक पालकांनी आपल्या मुलांना दि. 3 मे सायं 5 वाजेपर्यंत श्री गुरुदेव बाल सुसंस्कार शिबीरामध्ये नोंदणी करून सहभागी करावे असे आवाहन अरविंद देवतळे, गजानन ठाकरे, आनंदराव कडुकार, टिकाराम वाघमारे आणि गुरुदेव सेवा मंडळ सरडपार व चिमूर तालुका ग्राम जयंती प्रचार व प्रसार समितीच्या वतीने करण्यात येणार आहे.

error: Content is protected !!