Home क्रीडा राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेत गडचांदुरची चमू विजयी

राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेत गडचांदुरची चमू विजयी

1173

आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

गडचांदूर : महाराष्ट्र वॉरियर्स च्या व्हॉलीबॉल चमू ने नुकत्याच भंडारा येथे आयोजित राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी होऊन विजय मिळवीत गोवा येथे आयोजित राष्ट्रीय स्तरावर प्रवेश मिळविला व विजय प्राप्त करून गडचांदुर शहराचे नावलौकिक केले आहे.

.    महाराष्ट्र वॉरियर्स च्या टीम मध्ये आदित्य बिर्ला पब्लिक स्कूल चे विद्यार्थी निमिष पुरी, नैतिक नितीन कल्लेवार, सुशांत संपत रापोलु, कृणाल लांजे, अतुल चौधरी, आर्यन कुलमेथे, मंथन चिव्हाने, अनिरुद्ध मंदे, साकिब कुरेशी, हर्षित बोबडे, प्रीत मंदे यांचा समावेश आहे. वरील सर्व टीम चे भाजपचे शहराध्यक्ष अरुण डोहे, सतीश उपलेंचवार, उद्धव पुरी, डॉ. सुभाष चुन्ने, व्यापारी असोसिएशन यांनी अभिनंदन केले आहे. तसेच त्यांच्या या घवघवीत यशाबद्दल राजुरा क्षेत्राचे आमदार देवराव भोंगळे यांनी शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ व रोख रक्कम पाच हजार रुपये देऊन सत्कार व अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

error: Content is protected !!