नागभीड : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे 9 फेब्रुवारी 2025 मध्ये घेण्यात आलेल्या उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा वर्ग पाचवी व आठवीचा अंतरिम निकाल दि. 25 एप्रिल ला जाहीर झाला. दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा कर्मवीर विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय नागभीड ने शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तुंग यश प्राप्त केले.
. पूर्व प्राथमिक शिष्यवृत्ती गटातअनुष्का उत्तम मेश्राम आणि आरोही पुंडलिक खोब्रागडे यांनी तर पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती गटात पराग उत्तम मेश्राम या तीन विद्यार्थ्यांनी यश संपादन केलं. तसेच पराग उत्तम मेश्राम हा विद्यार्थी या वर्षीच्या एनएमएमएस शिष्यवृत्ती परिक्षेत जिल्ह्यातून अव्वल येत त्याही शिष्यवृत्तीस पात्र ठरला आहे हे विशेष. विद्यार्थ्यांनी व विद्यालयाने प्राप्त केलेले हे यश म्हणजे विद्यालयात होणा-या जादा वर्गाचे वर्षभर आयोजन, भरपूर सराव चाचणी परीक्षा, विद्यार्थ्यांचे अभ्यासातील सातत्य व कठोर मेहनत आणि शिक्षक वर्गांचे वेळोवेळी मिळणारे उत्कृष्ट मार्गदर्शन यांचा परिपाक आहे.
. विदयालयाचे प्राचार्य देविदास चिलबुले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात उत्तीर्ण तिन्ही विद्यार्थ्यांचे त्यांच्या पालकांसह पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन तथा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून कार्यशाळा प्रमुख युवराज ईडपाचे , आणि कनिष्ठ महाविद्यालयीन प्रमुख प्रा. देवानंद प्रधान मंचावर उपस्थित होते.
. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल गोंडवन विकास संस्थेचे अध्यक्ष राजाभाऊ देशपांडे, सचिव रविंद्रजी जनवार, संचालिका वर्षा जनवार तथा सर्व संचालक वृंद, प्राचार्य देविदास चिलबुले, पर्यवेक्षक ईडपाचे आणी सर्व प्राध्यापक, शिक्षक तथा शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद यांनी गुणवंत विद्यार्थी आणि मार्गदर्शक शिक्षक शरयू दडमल, महेश पुटकमवार, प्रतिभा कायरकर, मनेशा दडमल, गुरुदेव पिसे, प्रभु वाघधरे, राजेश धात्रक, किशोर नरुले, निखिल कोल्हे, राजू श्रीरामे यांचे यशासाठी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे संचालन सहा. शिक्षक पिसे यांनी केले.


