नागभीड
. आनंद निकेतन महाविद्यालय वरोरा येथे कार्यरत असलेले प्रमोद नागापुरे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त जन्मगावी जाऊन प्राथमिक आरोग्य उपकेंद्र कोटगाव च्या प्रांगणात वृक्षारोपण करून वाढदिवस साजरा केला.
. नागभीड तालुक्यातील कोटगांव येथील मुळचे रहिवासी असलेले प्रमोद नागापुरे हे वरोरा येथील आनंद निकेतन महाविद्यालयात कार्यरत आहे. मात्र त्यांचा वाढदिवस आला कि वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम राबवून वाढदिवस साजरा करतात. यावर्षी वरोरा येथे रक्तदान शिबीर राबवित कोटगाव येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र येथे वृक्षरोपन करण्यात आले.
. प्रमोद नागापुरे यांना सामाजिक कार्यात आवड आहे. आपला जन्म दिवस हा आगळा वेगळा व्हावा या हेतुने प्रेरीत होवुन उपकेंद्राच्या परिसरात आंबा, सिताफळ, निंबु, मोगरा, जास्वद, गुलाब,पारीजातक, चाफा, पेरु, मधुमालती अशा प्रकारच्या वृक्षाचे वृक्षरोपन करण्यात आले


