नागभीड : मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य द्वारा निर्धारित 100 दिवसीय कृती आराखड्याअंतर्गत 7 कलमी उपक्रमा निमित्त नागभीड सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने सी, एस. के. ब्लड सेन्टर नागपूर च्या विशेष सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.. या शिबिरात 50 रक्तदात्यांनी रक्तदान केले.
. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने रुग्णांना फार मोठ्या प्रमाणात रक्ताची गरज असते अश्यावेळी बांधकाम विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या या रक्तदान शिबिराचे फार महत्व आहे. रक्तदान करणाऱ्या सर्व रक्तदात्यांना ब्लड सेन्टर च्या वतीने प्रमाणपत्र,फळे व बिस्कीट देण्यात आले. सदर रक्तदान शिबिर कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग नागभीड जया ठाकरे यांच्या मार्गदर्शनात घेण्यात आले.
. यावेळी उपकार्यकारी अभियंता वर्षा गांगुर्डे, उपकार्यकारी अभियंता अरविंद रामटेके, शाखा अभियंता विलास चांदेकर, शाखा अभियंता शीतल मानापुरे, बांधकाम विभागाचे सचिन कुसुमडे, समाजिक कार्यकर्ते रमेश ठाकरे यासह सर्व कर्मचारी यांची उपस्थिती होती.


