आ. देवतळे यांच्या आश्वासनानंतर निप्पाण प्रकल्पग्रस्तांच्या आंदोलनाची सांगता

1

भद्रावती : पहलगाम येथील आंतकवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर निप्पान प्रकल्पग्रस्तांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी आयोजित करण्यात आलेली बैठक लांबणीवर गेली. मात्र येत्या काही काळात या बैठकीचे पुन्हा आयोजन करून निप्पान प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांवर व समस्यांवर निश्चितपणे तोडगा काढल्या जाईल असे आश्वासन आमदार करण देवतळे यांनी दिल्यानंतर गेल्या एक महिन्यापासून तहसील कार्यालयासमोर सुरू असलेल्या निपाण प्रकल्पग्रस्तांच्या आंदोलनाची सांगता करण्यात आली. मात्र आमदार देवतळे यांच्या या आश्वासनानंतर यावर तोडगा न निघाल्यास यापुढे आंदोलनाची नवी दिशा ठरविण्यात येईल असे निप्पान प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीतर्फे सांगण्यात आले.

.      गेल्या 25 वर्षांपासून रिकाम्या पडलेल्या व निप्पाण साठी संपादित करण्यात आलेल्या जागेवर दोन कंपन्यांच्या उभारणीचे काम सुरू करण्यात आले आहे. मात्र प्रकल्पग्रस्तांनी प्रति एकर दहा लाख रुपये अनुदान, नोकरीची हमी व त्रिपक्षीय करार करणे अशा मागण्या शासनासमोर ठेवलेल्या आहेत. त्यासाठी गेल्या एक महिन्यापासून निप्पान प्रकल्पग्रस्तांनी येथील तहसील कार्यालयासमोर आंदोलन सुरू केले होते. यादरम्यान अनेक लोकप्रतिनिधींनी आंदोलनाला भेट देऊन प्रकल्पग्रस्तांच्या समस्या जाणून घेतल्या. मात्र प्रकल्पग्रस्तांना न्याय देण्यात सदर लोकप्रतिनिधी हे अपयशी ठरले. त्यामुळे केवळ आश्वासना पलीकडे या प्रकल्पग्रस्तांची हाती काहीही लागलेले नाही. त्यामुळे आमदार करण देवताळे यांनी दिलेले आश्वासन कितपत खरे होईल हे येणारा काळच सांगेल.

.      यावेळी निप्पान प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीचे प्रवीण सातपुते, लिमेश माणूसमारे, मधुकर सावनकर, बंडू भादेकर, सुधीर सातपुते, बाबा तराळे, चेतन गुंडावार, नानेबाई माथनकर, देवराव खापने, तेजकरण बदखल, रवी बोडेकर, बापुराव सोयाम आदी ऊपस्थीत होते.