सात वर्षांची परंपरा आजही कायम
नंदोरी
. भद्रावती तालुक्यातील धानोली येथील मागील सात वर्षांपासून सुरू असलेली “एक गाव एक गणपती” ची परंपरा कायम असून या गावात सर्व धर्मीय लोक असून या गावात अजूनही एकोपा बघायला मिळतो.
. गावात सात वर्षापासून सह्याद्री मस्कऱ्या गणेश मंडळ धानोली यांचे विद्यमाने “एक गाव एक गणपती” मोठ्या थाटात साजरा करण्यात येतो. हे या गावातील परंपरा अजूनही कायम असून सर्व धर्मीय लोक गावात सुरू असलेल्या या कार्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहतात.
. संकटचर्थुर्थी ला गणपतीचा सामूहिक मिरवणूक काढून गणरायाचं आगमन करण्यात आले. यामध्ये सह्याद्री मस्कऱ्या गणेश मंडळ धानोली चे अध्यक्ष शंकर ठेंगणे, उपाध्यक्ष गजानन खापणे, सचिव नितेश बोढे, सदस्य विनोद विधाते, रविंद ढुमने, कैलास खापने, अमीर बोढे, गिरीधर धांडे, आशिष काळे, दिलिप विधाते, वैभव देरकर, अमोल देरकर, शाहीर आमने, सागर माडेकर, कौतिक खापणे, पंकज खापने, सचिन बोढे निलेश चौधरी, ललित बोढे तसेच गावातील सर्व नागरिकांनी मोलाचे सहकार्य केले.


