Home सामाजिक विहिरगाव येथे ग्रामजयंती प्रबोधन प्रचार यात्रा महोत्सवाची सांगता

विहिरगाव येथे ग्रामजयंती प्रबोधन प्रचार यात्रा महोत्सवाची सांगता

957

ग्रामजयंती प्रचार यात्रेची 131 गावांना भेट

 नेरी : अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ गुरुकुंज आश्रम मोझरी अंतर्गत चिमूर तालुका श्रीगुरूदेव सेवा मंडळ प्रचार समिती व्दारा ग्रामजयंती प्रबोधन यात्रेला 2 एप्रिल पासून श्री क्षेत्र गुंफा गोंदेडा येथून मोठया उत्साहात सुरवात झाली. 131 गावांना भेटी देत वंदनीय महाराजांनी सांगीतल्या प्रमाणे प्रत्येक गावात ग्रामजयंती साजरी करण्यात आली. दि 18 एप्रिलला विहिरगाव येथे या यात्रा महोत्सवाची सांगता झाली.

.       ग्रामजयंती चा मंत्र घ्याहो नवा देशात समता नांदवा या वंदनीय तुकडोजी महाराज यांच्या भजनाच्या उक्तीप्रमाणे संपूर्ण मानवात गावागावात शांती आणि समता नांदावी यासाठी ग्रामजयंती साजरी करावी अशी महाराजांची मनोकामना होती. त्याप्रमाणे चिमूर तालुका प्रचार समिती ने प्रत्येक गावाला भेटी देत ग्रामजयंती साजरी केली, यामध्ये महाराजांच्या विचारांचा प्रचार व प्रसार केला. प्रत्येक गावात महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या चरण पादुका ची पालखी फिरवून सर्वांना दर्शन दिले. दि 18 एप्रिलला तालुक्यातील देवरी करबडा, मदनापूर, बेलारा, गोंडामोहाळी, पारणा, पीपर्डा, पळसगाव आणि विहिरगाव आदी गावांना भेटी देत ग्रामजयंती साजरी केली.

.       विहिरगाव येथे या ग्रामजयंती यात्रेची सांगता झाली. यावेळी प्रबोधन यात्रेचे महत्त्व व राष्ट्रसंताच्या ग्राम उद्धाराच्या संकल्पनेविषयी प्रबोधात्मक मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमाला चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार बंटी भांगडीया यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी देविदास मेश्राम, सुखदेव ढोणे, प्रकाश सोनुने, नीलकंठ लोंनबले, बाबाराव दोहतरे, अशोक चरडे, नथ्यू भोयर यांनी उपस्थिती दर्शवून मार्गदर्शन केले. वंदनीय तुकडोजी महाराज यांचे विचार गावापर्यंत पोहचविण्याचे चांगला प्रयत्न केला गेला असून प्रत्येकांनी महाराजांचे विचार अंगिकार करावे असे प्रतिपादन आ बंटी भांगडीया यांनी केले. यावेळी विहिरगाव आणि परिसरातील गुरुदेव भक्त भाविक उपासक बंधू भगिनी मोट्या संख्येने उपस्थित होते. राष्ट्रवंदना व गुरुदेवांच्या त्रिवार जयघोषाने कार्यक्रमाची सांगता झाली. या कार्यक्रमाचे संचालन प्रभाकर पिसे तर प्रास्ताविक नथ्यू भोयर यांनी केले.

error: Content is protected !!