नागभीड : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती पंचायत समिती परिसर नागभीड येथील संकट मोचन हनुमान मंदिरात आनंदमय वातावरणात आणि उत्साहात साजरी करण्यात आली.
. याप्रसंगी, मान्यवरांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर कार्यावर प्रकाश टाकत मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्रा. दिगांबर चौधरी यांनी स्वातंत्र्य, समता, बंधुत्व आणि न्याय यावर आधारित भारताची राज्यघटना असून प्रत्येक वर्गाला समान संधी मिळालेली आहे तसेच ओबीसी जनगणनेवर प्रकाश टाकला.
. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थाना वरून बोलतांना प्रा. नरेंद्र गणवीर म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतिसूर्य महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची विचारधाराच व्यक्तीला विकासाकडे वाटचाल करायला लावते हे पटवून दिले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी विपरीत परिस्थितीशी संघर्ष करून, अन्यायाविरुद्ध लढून दिन-दुबळे, मागास यांना न्यायच मिळवून दिला नाही तर देशाचे कल्याणसुद्धा केले असे मौलिक विचार त्यांनी अध्यक्षीय भाषणात मांडलेत.
. याप्रसंगी सोनाली दिपक कोलते हिने काढलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या रांगोळी तैलचित्राबद्दल तिला गौरवण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन घुटके यांनी केले. तर आभार प्रदर्शन बांबोळे यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राकेश खरवडे, अनिल गजभिये, मिलिंद खापर्डे, धम्मकीर्ती मेश्राम, आशिष बावनकर, अखिलेश घुटके, गुड्डु वाढई, पंकज फटिंग, कुलदीप नागोसे, विशाल फटिंग, अमोल देशमुख, सुधीर जांभुळकर, प्रकाश पाथोडे, श्रेयश वाघमारे आणि समस्त मित्रपरिवार यांनी अथक परिश्रम घेतले व शेवटी आयोजकातर्फे भोजनदान करण्यात आला.


