वंचितचे अनोखे आयोजन
ब्रम्हपुरी : बुध्दगया महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाच्या समर्थनार्थ ब्रम्हपुरी येथे बौद्ध मंगल परिणयाला उपस्थित राहुन वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा आयटी सेल प्रमुख लिलाधर वंजारी यांनी अनोख्या पध्दतीने स्वाक्षरी मोहिम राबविली.
. बुध्दगया येथे सुरु असलेल्या महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाच्या समर्थनार्थ तसेच वंचित बहुजन आघाडी व भारतीय बौध्द महासभा यांच्या वतीने सुरु असलेल्या स्वाक्षरी मोहिमेला बळ देण्यासाठी हि अनोखी पध्दत राबविण्यात आली. यावेळी वर प्रजोत तेलंग व वधु शताब्दी सेवक देवगडे यांनी या आंदोलनाच्या समर्थनार्थ स्वाक्षरी करुन आपले सामाजिक दायित्व व कर्तव्य पुर्ण केले. शिवाय यावेळी शेकडो बौध्द बांधवांनी स्वाक्षरी करुन महाविहार मुक्ती आंदोलनास पाठींबा जाहीर केला. या नव वर वधुच्या कार्याचं सर्व उपस्थित समाजबांधवांनी कौतुक केलं आणि त्यांचा आदर्श ईतरही बौध्द समाज बांधवांनी घ्यावा व जास्तीत जास्त लाखोंच्या संख्येनी या स्वाक्षरी मोहिमेत सहभाग घ्यावा असं आवाहनही या नव दांपत्यांनी केलं. यावेळी स्वतः वधुचे वडील डॉ सेवक देवगडे यांनी या मोहिमेस बळ दिलं आणि आपली सामाजिक जबाबदारी पार पाडली. या शिवाय यावेळी सामाजिक कार्यकर्ते म्हणुन केशिप पाटील हे सुध्दा उपस्थित होते.


