Home सामाजिक नंदोरी ग्रामपंचायतच्या वतीने अपंग कल्याण निधी अंतर्गत कूल कॅन, कचरा बॅकेट वाटप

नंदोरी ग्रामपंचायतच्या वतीने अपंग कल्याण निधी अंतर्गत कूल कॅन, कचरा बॅकेट वाटप

1015

भद्रावती : तालुक्यातील नंदोरी ग्रामपंचायतमध्ये सन 2024-24 च्या 5 टक्के अपंग कल्याण निधी अंतर्गत नोंदणीकृत असलेल्या लाभार्थ्यांना कूल कॅन आणि कचरा बॅकेट चे वाटप आज (दि. 12) ला  करण्यात आले आहे.

.       ग्रामपंचायतच्या उत्पन्नाच्या 5 टक्के अंध, अपंग, दिव्यांग कल्याण निधी म्हणून खर्च करण्याची तरतूद आहे, त्यानुसार हा निधी वाटप करण्यात आला आहे. 28 लाभर्थ्यांना कूल कॅन आणि कचरा बॅकेट चे वाटप करण्यात आले.

.        यावेळी ग्रामपंचायत नंदोरी चे सरपंच मंगेश भोयर, ग्राम पंचायत सदस्य शरद खमानकर, किशोर उमरे, ग्राम पंचायत कर्मचारी तथा गावकरी उपस्थित होते.

error: Content is protected !!