शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या लढ्याला यश
शासन निर्णय जारी
नेरी : महाराष्ट्र राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी अनुदानित माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळातील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीचे व पद भरतीचे प्रमाण निश्चित करण्याचा शासन निर्णय दिनांक 4 एप्रिल 2025 रोजी शालेय शिक्षण व क्रीडा विभागातर्फे निर्गमित करण्यात आलेला आहे. यामध्ये कनिष्ठ लिपिक, पूर्णवेळ ग्रंथपाल, प्रयोगशाळा सहाय्यक ही पदे अनुकंपा 100 टक्के व उर्वरीत 80 टक्के पद भरती करण्यास शासनाने मान्यता दिली असून, अनेक दिवसापासून अनुशेषाच्या नावाखाली थांबवण्यात आलेली शिक्षकेतर पद भरती करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे अशी माहिती महाराष्ट्र राज्य माध्य. शाळा शिक्षकेतर महामंडळचे कार्याध्यक्ष मोरेश्वर वासेकर यांनी दिली आहे. मागील 21 वर्षाच्या प्रदीर्घ लढ्याला शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेला यश प्राप्त झाले असून सरळसेवा भरतीचा मार्ग मोकळा झाला असून शासन निर्णय जारी झाला आहे.
. या शासन निर्णयानुसार सर्व विभागीय आयुक्तांनी अनुशेष नोंदवही तपासून देण्याबाबत स्पष्ट सुचना देण्यात आलेल्या आहे. अनुशेष तपासणी करुन पद भरती करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. या शासन निर्णयामुळे माध्यमिक शाळातील रिक्त असलेली शिक्षकेतर पद भरती सुरू होऊन त्यांना मान्यता देण्यासाठी सर्व संबंधित शिक्षणाधिकारी व शिक्षण उपसंचालक यांनाही निर्देश देण्यात आलेले आहेत. सदर पद भरती करण्यास मान्यता मिळाल्याने राज्यातील नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेले 5000 शिक्षकेतर भावा बहिणींना दिलासा मिळाला असून या निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत करण्यात येत आहे.
शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण कनिष्ठ लिपिक, पूर्णवेळ ग्रंथपाल, प्रयोगशाळा सहायक ही अनुकंपा पदे 100 टक्के, तर उर्वरीत रिक्त पदांवर 80 टक्के पदभरती करण्यास सरकारने मान्यता दिल्याने अनेक दिवसापासून अनुशेषाच्या नावाखाली थांबवण्यात आलेली शिक्षकेतर पदभरती करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या निर्णयामुळे माध्यमिक शाळांतील रिक्त असलेली शिक्षकेतर पदभरती सुरू होणार असल्याने शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
मागील अनेक वर्षांपासून शिक्षकेतर पदांवर भरती थांबलेली होती त्यासाठी शिक्षकेतर महामंडळाच्या संघटनेच्या वतीने अनेक वर्षे लढा द्यावा लागला. त्यामुळे शासनाने दखल घेऊन आमच्या लढ्याला यश प्राप्त झाले व भरतीचा मार्ग मोकळा होऊन शासन निर्णय जारी झाला आहे 5 हजार पदे भरली जाणार असून सर्वांना दिलासा मिळाला आहे. शासन निर्णयाचे सर्वच स्तरावरून अभिनंदन होत आहे. मोरेश्वर वासेकर, कार्याध्यक्ष, म. रा. शिक्षकेत्तर कर्मचारी संघटना


