वरोरा : राष्ट्रीय दुर्बल घटक शिष्यवृत्ती योजना परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून त्यामध्ये विवेकानंद माध्यमिक विद्यालय वरोरा येथील इयत्ता 8 वीचा विद्यार्थी विनीत चंद्रशेखर दारव्हणकर हा एनएमएमएस या शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरला.
. त्याकरीता त्याचे सर्वस्तरावरुन कौतुक होत असून त्याच्या यशाचे श्रेय विद्यालयाच्या मुख्याध्यापीका मंगला ठेंगणे, वैशाली कुरेकार, उरकांडे, चौधरी, गौतमवार इतर सर्व शिक्षक वुंद तसेच आई अश्विनी दारव्हणकर, वडील चंद्रशेखर दारव्हणकर व आप्त परीवार यांना दिले शिक्षकवृंदानी घरी भेट देवुन विनित याचे कौतुकास्पद अभिनंदन केले.