Home सामाजिक प्रभू श्रीरामाच्या जयघोषाने दुमदूमली भद्रावती नगरी

प्रभू श्रीरामाच्या जयघोषाने दुमदूमली भद्रावती नगरी

989

नेत्र दीपक आतिषबाजीने भव्य शोभायात्रेची सुरुवात

रामनवमी उत्साहात साजरी

भद्रावती : श्रीराम जन्मोत्सव समिती भद्रावती तर्फे शहरात रामनवमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्ताने स्थानिक विठ्ठल मंदिरातून मर्यादापुरुषोत्तम प्रभू श्रीरामाच्या प्रतिमेची सायंकाळी सात वाजता भव्य शोभायात्रा काढण्यात आली.

.    राम नवमी निमित्त विठ्ठल मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी संपूर्ण शहरात शोभायात्रेच्या रस्त्यावर दुतर्फा विद्युत रोषणाई करण्यात आली. रस्त्यावर चौकाचौकात स्वागतद्वार उभारून चौकांना आकर्षक रित्या सजविण्यात आले होते. खासदार प्रतिभा धानोरकर, आमदार करण देवतळे, चंद्रकांत गुंडावार, रवींद्र शिंदे, माजी नगराध्यक्ष अनिल धानोरकर, सुनील नामोजवार यांच्या हस्ते प्रभू श्रीरामाचे पूजन करून फटाक्यांच्या नेत्र दीपक आतिषबाजीने शोभायात्रेची सुरुवात करण्यात आली.

.      सदर शोभा यात्रेत रामायण कालीन घटनांना उजाळा देणारे विविध चित्ररथ सहभागी करण्यात आले होते. ढोल,ताशे, डीजे, भजन,दिंड्या यासह निघालेली ही शोभायात्रा विठ्ठल मंदिर, वाल्मिकी चौक, मुख्य रस्ता,जुने बस स्थानक, भद्रानाग मंदिर अशी होत परत विठ्ठल मंदिरात आल्यानंतर शोभा यात्रेची सांगता करण्यात आली. शोभायात्रा बघण्यासाठी मुख्य बाजारात नागरिकांनी चांगलीच गर्दी केली होती. शोभायात्रेत शहरातील महिला तथा नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

error: Content is protected !!