जिल्हा साधन व ग्राम साधन व्यक्तींचा स्नेहमिलन सोहळा
चिमूर : सामाजिक अंकेक्षण प्रक्रियेतील जिल्हयातील सर्व ग्राम साधन व्यक्ती व जिल्हा साधन व्यक्ती यांचा एक दिवसीय स्नेहमिलन सोहळा व सत्कार सोहळा कार्यक्रम संपन्न झाला.
. सामाजिक अंकेक्षण प्रक्रियेतील ग्राम साधन व्यक्ती (सोशल ऑडिटर) हे मागील दोन महिन्यापासून नियमित काम मिळवण्यासाठी हक्काची लढाई लढत असून, ही लढाई जिल्ह्यांतील सर्व ग्राम साधन व्यक्तीने संघटीत राहून लढाई लढल्यास यश निश्चितच मिळेल. पण यासाठी सर्व ग्राम साधन व्यक्तीने संघटीत राहणे अत्यंत महत्वाचे आहे. असे प्रतिपादन जिल्हा साधन व्यक्ती विलास गजभे यांनी ग्राम साधन व्यक्तींच्या स्नेहमिलन कार्यक्रम सोहळ्याप्रसंगी सांगितले. सदर स्नेहमिलन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा साधन व्यक्ती विलास गजभे हे उपस्थित होते. तर कार्यक्रमांचे प्रमूख पाहुणे म्हणून जिल्हा साधन व्यक्ती पुरुषोत्तम गावतुरे, निलेश राऊत, जितेंद्र चौधरी, आशिष लोंढे, विकास मोहूर्ले, पल्लवी खोब्रागडे, ग्राम साधन व्यक्तीचे जिल्हाध्यक्ष अविनाश धोडरे, उपाध्यक्षा रेखा सहारे आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.
यावेळी जिल्हा साधन व्यक्ती विलास गजभे यांनी सांगितले की, तुमचा लढा हा शासनासोबत आहे. जिल्हाधिकारी यांनी निवड केलेल्या ग्राम साधन व्यक्तीना नियमित काम मिळावेत यासाठी लढा उभारला गेला आहे. पण हा लढा सर्वांनी संघटीत राहून एकसंघ होउन लढला गेला तर या संघटनेला यश नक्कीच मिळेल असे सांगितले. यासाठी आमच्याकडुन जे काही सहकार्य करता येईल ते आम्ही करत आहोत. आम्ही पण जिल्हा साधन व्यक्तींनी ग्राम साधन व्यक्तीना नियमित काम मिळण्यासाठी शासनाला अनेक पत्र दिलीत. पण रोजगार हमी योजनेच्या कामासाठी निधीच कमी येत असल्यामुळं सोशल ऑडिटचे नियमित काम मिळत नाही आहे. त्यासाठी शासनाचे किमान ६ टक्के निधी उपलब्ध करून दिला. तर राज्यांतील सर्व जिल्ह्यांतील पॅनलवर निवड झालेल्या प्रत्येक ग्राम साधन व्यक्तींच्या हाताला नियमित काम मिळेल अशी अपेक्षा यावेळी व्यक्त केली. आमचे सुद्धा आपल्या नियमित काम कसे देता येईल यासाठी शासनाकडे पत्र व्यवहार सुरु आहेत. असे सांगितले.
. यावेळी जिल्ह्यांतील सर्व जिल्हा साधन व्यक्ती यांचे शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आले. सर्व जिल्हा साधन व्यक्ती यांच्या सोबत बसून ग्राम साधन व्यक्तीनी सामाजिक अंकेक्षण प्रक्रियाबाबत सविस्तर चर्चा केली. कार्यक्रमाची सांगता स्नेहभोजनाने करण्यात आली. कार्यक्रमांचे प्रास्ताविक ग्राम साधन व्यक्तीचे जिल्हा अध्यक्ष अविनाश धोडरे यांनी केले. कार्यक्रमांचे संचालन विलास चौधरी यांनी केले. तर आभार प्रदर्शन रेखा साहारे यांनी मानले.
. कार्यक्रमाला सागर जांभुळे, रोशन ढोक, विजय चौधरी, स्वप्निल मजगवळे, प्रमोद राऊत, विलास चौधरी, आतिश देव्हारी, श्वेता रामटेके, अस्मिता दडमल, सोनल मुन, काजल पांगुळ, प्रज्ञा लेडांगे, वृणाली मडकाम, रत्नमाला मडावी, प्रीती नागोसे, ममता पेंदाम, प्रतिभा अलाम, सलोनी गावतुरे, सपना चौधरी, देवता सूर्यवंशी, लता कवठे, सत्यवती रामटेके, लोभीता देवगिरकर, स्वाती झाडे, वैष्णवी गुरनुले, टेमदेव मस्के, अनिल महाडोरे, निखिल कावळे, शशिकांत सहारे, रोहित सातपुते, हितेश मोहूर्ले, संतोष मोतकुलवार, श्रीकांत गजभिये, पंकज गायकवाड, योगेश लेंनगुरे, अरविंदा कऱ्हाडे, धर्मदास नागोसे, रूपेश नन्नावरे आदी जिल्ह्यांतील ग्राम साधन व्यक्ती उपस्थित होते.


