नेरी : चिमूर तालुक्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या लावारी (मरार) येथील जी प शाळेतील विद्यार्थ्यांनी नवोदय परीक्षेत उत्तीर्ण होत 100 टक्के निकाल लावीत गावाचे व शाळेचे नाव रोशन केले.
. जंगलाच्या कडेला वसलेल्या लावारी येथील जिल्हा परिषद शाळेचे श्लोक लोहकरे, दीप निकोडे, सोहम गुरनुले हे तीन विद्यार्थी नवोदय परीक्षेला बसले होते. या तिन्ही विद्यार्थ्यांनी चांगले गुण प्राप्त केले. त्यांच्या या कामगिरीने संपूर्ण गाव भारावून गेले. शाळेतील शिक्षक प्रेमचंद लोहकरे यांचे या विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन लाभले. सर्व स्तरावरून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


