चंद्रपूर : जिल्हा कारागृह येथे कारागृहातील बंदीवानांसाठी मंगळवारी जीवन गाणे गातच जावे’, या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. बंदिवानांना कारागृहात आनंदी वातावरणात जगण्यासाठी विविध उपक्रम राबविण्याचे शासनाचे निर्देश आहे. यात सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांच्यातीलही कलागुणांना विकसीत करणे, चांगले वर्तन ठेवण्यासाठी त्यांना प्रवृत्त करणे आदींचा समावेश आहे.
. यावेळी बंदीवासांसाठी योग गुन्हेगाराची सायकॉलॉजी या विषयावर मार्गदर्शन. गुन्हेगारीचे दुष्परिणाम व गुन्हे सोडल्यावरचे जीवन या विषयावर ऍडव्होकेट चैताली बोरकुटे-कटलावार यांनी मार्गदर्शन केले. कथक व देशभक्तीपर नृत्य सादर केले. त्यानंतर बंदीवासांसाठी संस्कृती देशभक्ती प्रबोधनपर स्वरसुगम संगीत ऑर्केस्ट्रा सादर करण्यात आला. त्यात देशभक्तीपर थोर महापुरुषांवर व संस्कृती हा विषय घेऊन अतिशय दर्जेदार गीते सादर करण्यात आली. या कार्यक्रमाचा कैद्यानी भरभरून आनंद घेतला.


