Home विदर्भ विघ्नहर्त्याला निरोप देताना विघ्न

विघ्नहर्त्याला निरोप देताना विघ्न

810

विसर्जना दरम्यान तिघेजण बुडाले

एकाचा मृत्यू, दोघे बेपत्ता

दोन सख्या भावांचा समावेश : एकाचा मृतदेह सापडला

चंद्रपूर

.         गणेश विसर्जनासाठी गोसीखुर्द नहरात उतरलेले तिघे जण नहराच्या पाण्यात वाहून गेल्याची घटना सावली येथे शनिवारी मध्यरात्री घडली. त्यापैकी एकाचा मृतदेह आढळून आला असून दोघांची शोध मोहीम सुरू आहे. सचिन उर्फ गुरु दिवाकर मोहुर्ले (33) किराणा व्यवसायिक, निकेश हरिभाऊ गुंडावार (31) , संदीप हरीभाऊ गुंडावार (27) रा.चांदली असे नहारात बुडालेल्या युवकांचे नाव आहेत. यापैकी सचिन मोहुर्ले याचा मृतदेह कालच रात्रीच आढळून आला. तर दोघांचा तपास सुरू आहे.

.         सावली येथील जय बजरंग गणेश मंडळातर्फे स्थापन केलेल्या गणेशाची विसर्जन मिरवणूक शनिवारी मोठ्या धुमधडाक्यात निघाली. सायंकाळी गणेशाचे विसर्जन करण्यासाठी पाच युवक गोसेखुर्द नहराच्या पाण्यात उतरले. मात्र त्यापैकी तिघांना पाण्याचा अंदाज न आल्याने ते वाहून गेले. याबाबतची माहिती होतात सर्वजण त्यांचा शोध घेऊ लागले. परंतु कोणीही हाती लागले नाही. त्यानंतर सावली पोलिसांच्या पथकांनी पाणबुड्यांच्या साह्याने त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. यावेळी सचिन मोहुर्ले याचा मृतदेह पोलिसांच्या हाती लागला. इतर दोघांचा शोध सावली पोलिसांच्या पथकाकडून सुरू आहे.

error: Content is protected !!