भद्रावती शहरात ‘जश्ने ईद मिलादुन्नबी’ उत्सवात

42
  • ख्वाजा गरीब नवाज कमिटी तर्फे विविध कार्यक्रमाचे आयोजन

भद्रावती

.          मुस्लीम धर्माचे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त आज गुरुवारी भद्रावती शहरात दिमाखदार जुलूस काढण्यात आला. पोलिसांवर पडणारा ताण लक्षात घेऊन मुस्लीम बांधवांनी यंदा वेळेची मर्यादा बाळगून ‘जश्ने ईद मिलादुन्नबी’ साजरा केला.

.          शहरातील जागोजागी मिठाई व खीरपुरी व जेवनाचे स्टाँल लावून गोर गरीब लोकांना मिठाई वाटली गेली. मुस्लीम समाज बांधवानी सकाळी गरीब नवाज मज्जिद भोज वार्ड मदिना मस्जिद मध्ये जाऊन (फजर) ची नमाज पठण करुन हाफिज मुजम्मिल यांनी कुराणाचे वाचण करण्यात आले व फतिया दरुद शरीफ करुण देशा सहीत तमाम जनतेसाठी अमन शांती ची दुवा मागण्यात आली. व परचम कुशाही करण्यात आली . दरम्यान नातिया खाणी, कुरान पठण, महिला वर्गाच्या समुपदेश कार्यक्रम व दुसऱ्या दिवशी मुफ्ती जुबेर रजा वणी यांचे तकरीर कार्यक्रम आयोजित केला होता मदिना मज्जिद व गरीब नवाज मज्जिद येथून जुलूसला प्रारंभ झाला.