ठाणेदारांनी पुढाकार घेत वाद मिटविला
देवस्थान कमेटी आणि गावकर्यांकडून ठाणेदारांचा सत्कार
वरोरा : तालुक्यातील ऐतिहासिक वारसा लाभलेल्या भटाळा येथे देवस्थान कमेटीच्या पदाकरीता मागील 6 वर्षा पासून वाद सुरू होता. या वादामुळे देवस्थानाच्या विकास कामाला अडथळा निर्माण झाला होता.गावकऱ्यांनी धर्मदाय आयुक्त कडे तक्रार दाखल केली. महाशिवरात्री उत्सवादरम्यान हा वाद चव्हाट्यावर आल्याने शेगांव पोलिस स्टेशन चे ठाणेदार योगेद्रसिंघ यादव यांनी पुढाकार घेत दोन्ही गटांना समोरासमोर आणत वाद मिटविला यामुळे गावकर्यांत व कमेटीच्या सभासदांनी आनंद व्यक्त करत ठाणेदारांचा सत्कार केला.
. भटाळा येथे विठ्ठल रुख्मिणी, हेमाळपंथी शिवमंदिर आणि भवानी माता मंदिर अशी पुरातत्व मंदिरे आहेत. या मंदिराच्या देखरेखेसाठी व होणारे कार्यक्रम या साठी गावकर्यांनी पुढाकार घेत कमेटी स्थापन केली. मात्र या कमेटीचा पदभार आणि आर्थिक व्यवहार माझ्याकडेच असावा यासाठी 6 वर्षापासून वाद सुरु झाला. या देवस्थानच्या नावाने अंदाजे वीस ते पंचेवीस एकर शेतजमीन आहे. जुनी कमेटी आपल्या मर्जीतील शेतकर्यांना शेती भाड्याने देत होती. सचिव आणि कोषध्यक्ष हे वेगवेगळ्या गटाचे असल्याने वाद निर्माण होऊन बँक खाते बंद पडले. त्यामुळे देवस्थानचा लाखो रुपयाचा व्यवहार रामभरोसे चालत होता. त्यामुळे या देवस्थानाला भ्रष्ठाचाराची किड लागली. त्यामुळे हे प्रकरण गावकर्यांनी धर्मदाय आयुक्त कार्यालयाकडे तक्रार देत पुढील कारवाई साठी सादर केले. त्यामुळे या देवस्थान कमेटीवर प्रशासक यांची नेमणूक करावी अशी मागणी केली, याच मागणीची दखल घेत धर्मादाय आयुक्त यांनी सतत चार वर्षा पासून आर्थिक व्यवहार बघण्यासाठी निरीक्षक यांची तीन दिवसासाठी नेमणूक केली आहे असे वाद असताना मात्र मागील चार वर्षे सचिव ज्या गटाकडे होते त्यांनी देवस्थान चे काम बघितले मात्र या वर्षी सचिव दुसऱ्या गटाकडे गेल्याने आज पर्यंत जो गट काम पाहत होता त्यांना हे पराभवले नाही म्हणून त्यांनी सचिव गटाचा विरोध करण्यास सुरुवात केली मात्र सचिव गटातील सदस्य आज पर्यंत सचिव तुमच्या गटाकडे होता तुम्ही काम बघितले आज आमच्या कडे आहे आम्ही महाशिवरात्री कार्यक्रम करणार यावर ठाम असताना विरोधी गट मानायला तयार नव्हता, महाशिवरात्री महोत्सव जवळ आल्याने वाद वाढत गेला शेवटी शेगाव येथील ठाणेदार यांच्या कडे प्रकरण गेले. ठाणेदार यादव यांनी दोन्ही गटांतील पदाधिकारी व गावकर्यांना एकत्रित आणत 6 वर्षापासून पेटत असलेला वाद अखेर संपूष्ठात आणला. आणि महाशिवरात्री साठी येणार्या लाखो भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून ठाणेदार योगेद्रसिंघ यादव यांनी योग्य ते पाऊल उचलून निर्णय दिला तसेच तीन दिवस येणाऱ्या सर्व भाविक भक्तांची काळजी घेत योग्य तो पोलीस कर्मचारी स्टाप बोलावून समस्त भाविकांचे आणि गावकरी यांचे मने जिंकली त्याचीच पावती म्हणून गावकरी आणि देवस्थान कमेटी यांनी ठाणेदार यादव यांचा सत्कार करून पोलीस प्रशासनाचे आभार मानले.
मागील सहा वर्षांपासून आमच्या गावातील आर्थिक व्यवहार आणि पदा साठी देवस्थान कमेटी मध्ये वाद चालू आहे त्यामुळे आज देवस्थान कमेटी कडे कुठलाही निधी शिल्लक नाही तसेच या वादा मुळे आमच्या गावामध्ये विदर्भातील सर्वात मोठे देवस्थान असून कुठल्याही प्रकारचा विकास झालेला नाही त्यामुळे धर्मदाय आयुक्त यांनी वादग्रस्त दोन्ही कमेटी सदस्य रद्द करून गावातील निर्व्यसनी युवक यांची नियुक्ती करावी. रविंद्र राजाराम दडमल, रा. भटाळा


