जुण्या आठवणींना दिला उजाळा
२0 वर्षानंतर आले एकत्र
बल्लारपूर : एकेकाळी ते सोबत शिकले.एकमेकाशी भांडले. विविध शालेय स्पर्धेत भिडले. तदनंतर शाळेतून दूर गेले. आता ते वेगवेगळ्या ठिकाणी कार्यरत झाले. मात्र शाळेतील आठवणीची ओढ त्यांना सतावत होती. त्यातील काहींनी समाज माध्यम ग्रुप तयार केला. या माध्यमातून तब्बल २0 वर्षानंतर एकत्र आले. शाळेतील जुण्या आठवणी जाग्या झाल्या. त्यांचे स्नेहसंमेलन बल्लारपूर तालुक्यातील विसापूर येथील चिंतामणी माध्यमिक विद्यालयात रविवारी पार पडले. यावेळी माजी विद्यार्थ्यांनी शाळेत जतन केलेल्या आठवणींना भावनेतून मोकळी वाट करून दिली.
. विसापूर येथील चिंतामणी माध्यमिक विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांच्या स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान जेष्ठ शिक्षक अरुण टोंगे यांनी भूषविले. यावेळी सेवानिवृत्त शिक्षक विनायक काळे, माजी शिक्षक वामन टोंगे, चंद्रकांत पावडे, शुभांगी बरडे, सोनाली आत्राम, श्रद्धा साखरकर, मुन्नालाल पुंडे, रविंद्र कोडापे, सुभाष भटवलकर आदींची उपस्थिती होती.
. याच शाळेत आपण २0 वर्षापूर्वी एकत्र होतो. येथील शिक्षण पूर्ण झाले. अन प्रत्येकांच्या वाटा वेगवेगळ्या झाल्या. स्नेहसंमेलनाच्या माध्यमातून प्रत्यक्ष भेट झाली. जुण्या जतन केलेल्या आठवणी ताज्या झाल्या. यावेळी माजी विद्यार्थ्यांनी जीवन प्रवासातील अनुभव कथन केले. यामुळे काहींचा जीवन संघर्ष उलघडला.डोळे देखील पाणावले. मनोरंजनातून हास्यविनोद घडला.यानिमित्ताने २0 वर्षापूर्वी ची जुणी आठवण ताजी झाली. विशेष म्हणजे यावेळी माजी विद्यार्थ्यांनी शिक्षकांना वर्गात शिकविण्याचा आग्रह केला. ते कार्य देखील ज्या विद्यार्थांना आपण २0 वर्षापूर्वी शिक्षण दिले. ते विद्यार्थी आजही एवढ्या कालावधी नंतर आज्ञाधारक असल्याने शिक्षकांनी समाधान व्यक्त केले.


