चंद्रपूर : जिल्हा निहाय व्यावसायिक बैठक आणि एलएलसी वार्षिक समारोह नुकताच पार पडला. यात सोशल मीडिया मार्केटिंग या करिता भद्रावतीचे नफिस अहेमद यांना स्मृती चिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
एमकेसीएल च्या वतीने जिल्ह्यातील अधिकृत संगणक प्रशिक्षण केंद्रातील समन्वयकांना पुरस्कृत करण्यासाठी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
. या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून एमकेसीएल चे उपमहाव्यवस्थापक डॉ. दीपक पाटेकर हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून पूर्व वीदर्भ, समन्वयक शशिकांत देशपांडे, वरिष्ठ महाव्यवस्थापक कुंदन रामटेके, व्यवस्थापक दयानंदा कटरे, जिला समन्वयक लक्ष्मीकांत कांबळे उपस्थित होते. या कार्यक्रमांमध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व अधिकृत एम एस सी आय टी केंद्र चालक उपस्थित होते.


