Home सामाजिक शिवाजी महाराज जयंती निमित्त शिवशाहीचा जागर

शिवाजी महाराज जयंती निमित्त शिवशाहीचा जागर

1103

छत्रपती शिवाजी महाराज विकास मंडळाचे आयोजन

कीर्तनातून सामाजिक एकतेचा संदेश

बल्लारपूर : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त बल्लारपूर तालुक्यातील विसापूर येथे अश्वारुढ शिवाजी महाराजांच्या देखाव्यासह ढोलताशांच्या गजरात मिरवणूक, सामाजिक बांधिलकी जपणारे रक्तदात्यांचा सत्कार, प्रबोधनकार लक्ष्मणदास काळे यांच्या कीर्तनातून सामाजिक संदेश, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर मान्यवरांचे प्रबोधन आदी कार्यक्रमाच्या माध्यमातून विसापूर येथे शिवाजी महाराज जयंती निमित्त शिवशाहीचा जागर करण्यात आला. याचे आयोजन छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक विकास मंडळाच्या कार्यकर्त्यांनी केले.

.      बल्लारपूर तालुक्यातील विसापूर येथे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील अश्वारुढ शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला मालार्पण करून सैनिक शाळेचे उपप्राचार्य लेफ्टनंट कर्नल संजय पटीयाल यांच्या हस्ते शिवाजी महाराज जयंती कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले. तदनंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेसह अश्वारुढ शिवाजी महाराज देखाव्यासह ढोलताशांच्या गजरात मुख्य मार्गाने शिवशाहीचा जागर करत मिरवणूक काढण्यात आली. मिरवणूकीचे सारथ्य भजन मंडळे व छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी केले. दरम्यान सांयकाळी छत्रपती शिवाजी महाराज चौक, सार्वजनिक मंचावर जिल्हा परिषद हायस्कूलचे मुख्याध्यापक दिनेश वरघणे यांच्या अध्यक्षतेखाली प्रबोधन कार्यक्रम पार पडला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून माजी सैनिक रामदास हरणे, विष्णू धुर्वे, ऋषी नगराळे, सुनिल रोंगे, सरपंच वर्षा कुळमेथे, प्रणाली मिलमीले, योगेश निपुंगे, सत्कारमूर्ती राजेश गावंडे, सुरज गोहणे यांची उपस्थिती होती.

.     यावेळी सामाजिक बांधिलकी जोपासून रक्तदान करणाऱ्या रक्तदाते राजेश गावंडे व सुरज गोहणे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रबोधन कार्यक्रम दरम्यान मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार व आचारावर समाज बांधवांनी वाटचाल करण्याचा संकल्प करावा, असा संदेश दिला. दरम्यान प्रबोधनकार लक्ष्मणदास काळे महाराज यांनी ओजस्वी कीर्तनातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यशैलीचा व शिवशाहीचा जागर केला. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक विकास मंडळाचे अध्यक्ष प्रज्वल पिंपळकर, आकाश गिरडकर, प्रफुल्ल गौरकर, अंकीत वडस्कर, बादल धोटे, प्रदीप लांडगे, सौरभ गिरसावळे, अक्षय वडस्कर, निकीता आडकीने आदींनी सहकार्य केले.

error: Content is protected !!