Home सामाजिक खासदार चषक अखिल भारतीय व्हॉलीबॉल स्पर्धेत पुरुष गटात चेन्नई तर महिला गटात...

खासदार चषक अखिल भारतीय व्हॉलीबॉल स्पर्धेत पुरुष गटात चेन्नई तर महिला गटात कोलकत्ता विजयी

1097

वरोरा : वरोरा स्पोर्टस फाउंडेशन वरोरा (WSF) व लोक शिक्षण संस्था वरोडा यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित स्वर्गीय बाळूभाऊ धानोरकर स्मरणार्थ आयोजित खासदार चषक अखिल भारतीय व्हॉलीबॉल स्पर्धेमध्ये पुरुष गटात एसआरएम यूनिवर्सिटी चेन्नई या संघाने इंडियन नेव्ही या संघाचा तीन- दोन अशा सेट्स नी पराभव करीत अजिंक्यपद फटकाविले. तर महिला विभागात ईस्टर्न रेल्वे कोलकत्ता संघाने सेंट्रल रेल्वे मुंबई या संघाचा तीन- शून्य असा पराभव करीत विजेतेपद फटकाविले.

.       वरोरा येथील स्थानिक लोकमान्य महाविद्यालयात स्व. मनोहर भाऊ पाटील क्रीडा परिसरात खेळल्या गेलेल्या स्पर्धेत पुरुष गटात तृतीय स्थान महाराष्ट्र पोस्टल संघाने ऑरेंज सिटी संघाचा पराभव करीत पटकाविले तर ऑरेंज सिटी संघ हा चतुर्थस्थानावर राहिला महिला विभागात एसआरएम यूनिवर्सिटी चेन्नई या संघाने साउथसेंट्रलरेल्वे सिकंदराबाद या संघाचा पराभव करीत तृतीय स्थान फटकाविले तर सिकंदराबाद हा संघ चतुर्थस्थानावर राहिला या स्पर्धेमध्ये पुरुष गटात 13 संघाने भाग घेतला होता तर महिला गटात सहा संघाने भाग घेतला होता पुरुष गटात सर्वोत्कृष्ट खेळाडूचा मान एसआरएम युनिव्हर्सिटीच्या तरन गौडा याला मिळाला तर महिला विभागात उत्कृष्ट खेळाडूचा मान इस्टर्न रेल्वे कोलकत्ता च्या प्रेरणा हिला मिळाला पुरुष गटात वैयक्तिक पुरस्कार व्यंकटेश( महाराष्ट्र पोस्टल) आयुष इंडियन नेव्ही ओम लाड (एस आर एम युनिव्हर्सिटी) साहिल कनवाल (इंडियन नेव्ही) तंगू बालू (एस आर युनिव्हर्सिटी) आयुष (इंडियन नेव्ही) तर महिला विभागात त्रिशा( एसआरएम युनिव्हर्सिटी) साथी दास (साउथ सेंट्रल रेल्वे) कविता व मुत्तू ( सेंट्रल रेल्वे मुंबई), जुही शहा (ईस्टर्न रेल्वे) यांना मिळाला.

.     स्पर्धेदरम्यान दिनांक 19 फेब्रुवारीला पत्रकार, क्रीडा क्षेत्रात योगदान देणारे वरोरा तालुक्यातील क्रीडा शिक्षक, पंच यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी माजी आंतरराष्ट्रीय खेळाडू तथा भारतीय व्हॉलीबॉल महासंघाचे माजी सरचिटणीस रामअवतारसिंग जाखर हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. रामअवतारसिंग जाखर यांचा विशेष सत्कार आयोजन समितीतर्फे करण्यात आला. खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या विशेष सहकार्याने संपन्न झालेले या स्पर्धेमध्ये बक्षीस वितरण समारंभ लोक लोक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. श्रीकांत पाटील, माजी नगराध्यक्ष आहेतेशाम अली, आयोजन समितीचे अध्यक्ष मानस धानोरकर, समीर बारइ, अनिल काळे, शुभम चिमूरकर यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

.   स्पर्धा यशस्वी करण्याकरिता लोकशिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. श्रीकांत पाटील यांच्या मार्गदर्शनात वरोरा स्पोर्ट्स फाउंडेशन वरोरा चे अध्यक्ष गजानन जीवतोडे व आयोजन समिती अध्यक्ष मानस धानोरकर, सुनील बांगडे, देवानंद डुकरे विनोद उमरे, किशोर पिरके, मिलिंद कडवे यांच्या नेतृत्वात वरोरा स्पोर्ट्स फाउंडेशन वरोरा व लोकशिक्षण संस्था वरोडा यांनी अथक परिश्रम घेतले.

error: Content is protected !!