Home सामाजिक शिवजयंती निमित्त ताडोबात विद्यार्थ्यांना शैक्षणिक भेटवस्तूंचे वाटप

शिवजयंती निमित्त ताडोबात विद्यार्थ्यांना शैक्षणिक भेटवस्तूंचे वाटप

1359

भद्रावती : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधत ताडोबा वन स्टेप सोल्युशनतर्फे भद्रावती तालुक्यातील मोहर्ली येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. या उपक्रमात स्थानिक युवकांनी पुढाकार घेत विद्यार्थ्यांना उपयोगी ठरणाऱ्या वह्या, पेन, वह्यांचे सेट, रंगीत खडू यांसारखी शैक्षणिक साधने वाटप केली.

.      ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या कुशीत वसलेल्या मोहर्ली गावातील अनेक विद्यार्थ्यांना आर्थिक अडचणीमुळे शिक्षणासाठी पुरेशा सुविधा मिळत नाहीत. अशा परिस्थितीत सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून हा उपक्रम हाती घेण्यात आल्याचे संयोजक सुयोग भोयर यांनी सांगितले. या शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रमासाठी ताडोबातील स्थानिक युवकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.

. यात स्वराज शेंडे, शुभम भोयर, पलाश शेंडे, रूपेश पारशिवे, परमेश्वर भोयर, अनिकेत दडमल, पूनम सोनूले, घनश्याम निकोरे, संदीप महाडोळे, पियूष दुर्बुळे, निखिल चुनारकर, रितेश बडकी, कुणाल गुमडेलवार, कमलाकर महाडोळे यांचा समावेश होता. या युवकांनी स्वतः आर्थिक योगदान देत आणि मदत संकलन करून हा उपक्रम राबविला.

error: Content is protected !!